Nashik News : चांदवडच्या ऐतिहासिक ‘रंगमहल'मध्ये पर्यटकांना ‘नो एंट्री'

chandawad Rangmahal
chandawad Rangmahalesakal
Updated on

Nashik News : चांदवड एकेकाळचे उपराजधानीचे गाव. ‘चांदोरी रुपया’ प्रसिद्ध असलेल्या गावात होळकर वाडा अर्थात, रंगमहल प्रसिद्ध आहे. पुरातत्त्व विभागाने सुरु केलेल्या कामामुळे पर्यटकांसाठी ‘नो एंट्री’ आहे. (No entry for tourists in historic Rangmahal of Chandwad nashik news)

१९९०-९१ मध्ये तत्कालीन मंत्री संजय देवतळे यांनी वाड्याच्या संवर्धनासाठी तीन कोटी मंजूर केले होते. माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. पुढे महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने पाच कोटी मंजूर केले होते.

रायगड विकास प्राधिकरण करून किल्ल्याचा विकास केला तसे उत्तर महाराष्ट्र प्राधिकरण करून नाशिक जिल्ह्यातील वाडे, मंदिरे, किल्ले आणि बारवांचे संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. रंगमहालाचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाडा भव्यदिव्य, भक्कम, सुबक भुईकोट प्रकारातील आहे.

कोरीव नक्षीकाम आणि काष्ठशिल्पातील अजोड व अवर्णनीय कलाकुसरीने नटलेला आहे. अशा प्रकाराची कलाकुसरीची जगात मोजकी ठिकाणे आहेत. दरबारातील पौराणिक भित्तीचीत्रांची अवस्था बिकट झाली असून त्यांचे संवर्धन होणे आवश्यक बनले आहे. तसेच वाड्यातील मजबूत दरवाजा, विशाल सभागृह, उंच मनोरे, खास करून त्याचा राजेशाही रुबाब हा पर्यटकांना आकर्षित करत असतो. या वाड्याचे संवर्धन इतक्या वर्षानंतर कसे होवू शकले नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

chandawad Rangmahal
NMC Tax Discount Scheme : महापालिकेच्या तिजोरीत 8 दिवसात 3 कोटीची भर! सवलत योजनेचा दुसरा टप्पा

लेझर-शो, अहिल्याबाई होळकरांचे जीवन चरित्र दाखविणे, माहिती फलक लावणे अशी कामे कागदावर राहणार काय? असा प्रश्‍न तयार झाला आहे. वाड्यातील दैनंदिन देखभालीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पुरातत्त्व विभागाच्या कामांचे नियोजन माहिती नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेला कामे करता येत नाहीत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

बारवचे संवर्धन आवश्‍यक

पाच एकरातील होळकर वाड्यात एक बारव आहे. वर्षभर पिण्याचे पाणी देणारी ही बारव पूर्वी चांदवडकरांना पाणीपुरवठा करत होती. बारवची अवस्था बिकट झाली असून पायरीवर भिंत बांधून आत जाण्याचा रस्ता बंद केला आहे. बारवजवळ मोठी झाडे आली असून अहिल्याबाई होळकरांनी निर्माण केलेली ही बारव आता शेवटचा श्वास घेत आहे. या बारवचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

chandawad Rangmahal
NMC News: महापालिका लेखा परिक्षण विभागाचे खासगीकरण! द्विनोंद लेख्यांचे बाह्य संस्थेकडून लेखा परिक्षण

"वाड्याचे काम लवकर सुरू होईल. पर्यटकांना वाडा पाहण्यास सध्या परवानगी देता येणार नाही. सरकारी निधी मिळतो तसे काम होते. पाच कोटींपैकी दोन कोटी मिळाले आहेत. अंदाजपत्रक तयार करून झाले असून निविदा काढून लवकर कामे सुरु होतील. झालेली कामे पुन्हा करावी लागणार असून टप्याटप्याने वाड्याचे काम होईल. इथे पहारेकरी नसल्याने पर्यटक आतमध्ये सोडणे शक्य नाही. सरकारकडे दहा ते बारा कर्मचारी वाड्यासाठी देण्याची मागणी केली आहे." - आरती आळे, सहाय्यक संचालिका, पुरातत्त्व विभाग

"महाराष्ट्राला हेवा वाटेल असा चांदवडचा रंगमहाल पर्यटकांना बघता येत नाही. याचे खूप वाईट वाटते. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या वाड्याचे काम ‘व्हिजन' ठेवून करायला हवे. आतमध्ये पर्यटकांना प्रवेश देवून काम करता येवू शकेल.

काम लवकर सुरु करावे व पर्यटकांना वाडा बघू द्यावा. अन्यथा आम्ही आंदोलन करण्याच्या विचारात असून विधानसभेत हा विषय मांडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत." - रामभाऊ लांडे, अध्यक्ष, राजमाता अहिल्यादेवी होळकर शोध संस्थान, महाराष्ट्र राज्य

chandawad Rangmahal
Nashik News : पांजरपोळ येथील दीडवर्षीय पिल्लाचा मृत्यू; अत्यवस्थ उंटावर उपचार सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.