Nashik Vehicle Towing: 24 तासात स्थगितीची नामुष्की! वाहनांच्या टोइंगला काही दिवसांसाठी ब्रेक

Nashik Vehicle Towing Stop
Nashik Vehicle Towing Stopesakal
Updated on

Nashik Vehicle Towing : बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने तीन महिन्यांनंतर पुन्हा नो- पार्किंगमधील वाहनांची टोइंग सुरू केली. परंतु अवघ्या २४ तासात स्थगिती देण्याची नामुष्की पोलिस आयुक्तालयावर ओढवली.

मूळात, शहरात अनेक ठिकाणी नो- पार्किंग फलक नाहीत. रस्त्यालगत मारलेले पार्किंगचे पट्टे धूसर झालेले आहेत. याबाबत पोलिस आयुक्तालयाने पाठपुरावा केल्यानंतरही महापालिका जुमानत नसल्याने अखेर सीएसआर निधीतून येत्या काही दिवसात सदर कामे केली जाणार आहेत.

त्यानुसार पुन्हा वाहनांची टोइंग सुरू होणार आहे. मात्र, पार्किंगबाबत तक्रारी असतानाही आणि नव्याने ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू असताना टोइंग सुरू करण्याची घाई का, याबाबत उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये आहे. (No excuse for suspension in 24 hours Break on towing of vehicles for few days nashik news)

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये १५ मार्चपासून टोइंग ठेकेदारास मुदतवाढ न देता कारवाई रोखली होती. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, अडीच महिन्यांपासून बंद असलेली टोइंग गेल्या गुरुवार (ता. २५) पासून अचानक सुरू केली.

त्यामुळे वाहनचालकांचे पुन्हा धाबे दणाणले होते. यापूर्वीही वाहनचालकांनी टोइंग कारवाईला विरोध करताना अनेक समस्यांबाबत तक्रारी केल्या होत्या. नो-पार्किंग फलक नसताना वाहनांचे टोइंग करणे, रस्त्यालगत पूर्वी वाहन पार्किंगसाठी जागा निश्‍चित करून पट्टे मारले होते. आता ते पट्टे धूसर असल्याने दिसत नाही.

त्यामुळे दुचाकी वा चारचाकींची टोइंग केल्यास त्यावरून पोलिस आणि वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग उद्‌भवतात. या तक्रारींचे निराकरण न करताच पुन्हा टोइंग सुरू केल्याने वाहनचालकांनी रोष व्यक्त केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Vehicle Towing Stop
‘टोइंग व्हॅन’च्या कर्मचाऱ्यांकडून मुजोरगिरी अव्वाच्या सव्वा दंड वसुली : शिस्तीच्या नावाखाली नागरिक वेठीस

अनेकांच्या भुवया उंचावल्या

गुरुवारी पूर्वीच्या टोइंग ठेकेदारास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार ठेकेदाराकडून टोइंग सुरू केली. मात्र, यास २४ तास उलटत नाही तोच, स्थगिती देण्याची नामुष्की पोलिस आयुक्तालयावर ओढवली.

नवीन टोइंग ठेक्यासाठी प्रक्रिया आयुक्तालयामार्फत सुरू असल्याचे सांगितले जाते. प्रक्रिया सुरू असताना पूर्वीच्या ठेकेदारास पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

त्यास ठेकेदारास मुदतवाढ द्यायचीच होती तर, गेल्या मार्चमध्येच का नाही दिली, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. नो-पार्किंगचे फलक, पार्किंग मार्किंग करण्याबाबत पोलिस आयुक्तालयाने पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

त्यामुळे पोलिस आयुक्तालयाने काही औद्योगिक कंपन्यांच्या सीएसआर निधीतून नो- पार्किंग फलक, मार्किंग करण्याची काम केली जाणार आहेत. त्यानंतर नो- पार्किंगमधील वाहनांची टोइंग करण्याला ठेकेदारास परवानगी दिली जाणार आहे.

Nashik Vehicle Towing Stop
NMC Disaster Management : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आराखडा

एक ना अनेक तक्रारी

* शहरातील पार्किंगची समस्या नवीन नाही.
* नो-पार्किंगचा फलक नसताना वाहनांची टोइंग
* नो-पार्किंगमध्ये चारचाकी-दुचाकी असेल तर दुचाकीचीच टोइंग केली जाते.
* स्मार्ट रोडवर दुतर्फा चारचाकी वाहनांची पार्किंग केली जाते, त्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
* रस्त्यालगत पार्किंगसाठी पांढऱ्या व पिवळ्या पट्ट्याची मार्किंग धूसर
* एक ना अनेक तक्रारी असताना टोइंग सुरू करणे पोलिसांच्या अंगलट.

"शहरात अनेक ठिकाणी नो- पार्किंग फलक, मार्किंग नाही. याबाबत वाहनचालकांकडून तक्रारी आल्याने टोइंगला काही दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली. तक्रारींचे निराकरण केल्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार पुन्हा टोइंग सुरू केली जाईल."

- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा.

Nashik Vehicle Towing Stop
NMC Budget: दायित्व लपवीत 333 कोटींचा अर्थसंकल्पीय घोटाळा; नाशिक महापालिकेचा सदोष अर्थसंकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.