NMC News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाशिवाय कामकाजात गतिमानता अपेक्षित आहे. परंतु याउलट परिस्थिती प्रशासकीय राजवटीत दिसून येत आहे.
त्याव्यतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या अनुपस्थितीत तक्रारींचा निपटारा दूरच प्राप्त तक्रारींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासन प्रमुख नसल्याने शहराला कोणी वाली नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (no head of administration no people representatives Pile of complaints at NMC Nashik News)
नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महापालिकेकडून तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१६ मध्ये महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्मार्ट नाशिक ॲप कार्यान्वित केले.
या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना तक्रार करण्याबरोबरच विकासकामांची प्रगती किती झाली, याचीदेखील नोंद होती. नागरिकांना फोटो अपलोड करण्याचीदेखील व्यवस्था ॲपमध्ये होती. या ॲपवर वर्षभरात ६० हजाराहून अधिक तक्रारी दाखल झाल्या.
तक्रारींचा निपटारा सात दिवसात करणे बंधनकारक केल्याने नागरिकांचा तक्रारींचा ओघ वाढण्याबरोबरच तक्रारींचे निराकरण गतीने होवू लागले. त्यानंतर नाशिक स्मार्ट ॲप ऐवजी काही प्रमाणात सुधारणा करून नाशिक ई-कनेक्ट ॲप महापालिकेने विकसित केले.
मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर तक्रारींचे निराकरण करण्याचा वेग कमी झाला. लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दाद मिळत नाही. त्यामुळे तक्रारी वाढल्या.
एकीकडे लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनावर वचक नाही, तर आता प्रशासन प्रमुख, आयुक्तच रजेवर असल्याने महापालिका मुख्यालयात आलबेल असल्याची परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.
प्रशिक्षणासाठी रजेवर जाताना आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पोर्टलवरील तक्रारींचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. परंतु , अधिकारीच जागेवर नसल्याने तक्रारी सुटणार कशा असा सवाल उपस्थित होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सरकारी पोर्टलच्या विभागनिहाय तक्रारी
- अतिक्रमण विभाग- ३२
- नगर नियोजन विभाग- २०
- मिळकत विभाग - ४
- बांधकाम विभाग-३
- सार्वजनिक आरोग्य- २
- घनकचरा व्यवस्थापन- ४
- विद्युत विभाग- १
- भूसंपादन-१
- सामान्य प्रशासन-१
एनएमसी ई-कनेक्ट अॅपवरील तक्रारी
- पशुसंवर्धन १३६
- आरोग्य अभियांत्रिकी विभाग १३२
- अतिक्रमण १०६
- घनकचरा व्यवस्थापन- ९९
-बांधकाम- ११
- विद्युत व यांत्रिकी- ५१
-सार्वजनिक आरोग्य- ४२
- उद्यान- ४९
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.