पोषण आहाराचे ऑडिट शाळा स्तरावर नको; शिक्षण आयुक्त मांढरेंना साकडे

nashik latest marathi news
nashik latest marathi newsesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : राज्यातील सर्व शाळांचे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत (Nutritional Diet scheme) मागील पाच वर्षांच्या काळातील लेखापरीक्षण शाळा स्तरावर न करता प्रत्येक पंचायत समिती (Panchayat Samiti) स्तरावर करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Education Commissioner suraj Mandhare) यांचेकडे निवेदन देऊन केली.

सिन्नर येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी श्री. मांढरे उपस्थित होते. त्यावेळी उभय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना समक्ष भेटून ही विनंती केली.

राज्यातील सर्व शाळांचे पोषण आहार अंतर्गत लेखापरीक्षण करण्याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) कार्यालयाकडून काढण्यात आला असून हा आदेश जिल्हा परिषद संलग्न प्राथमिक शाळांसाठी अन्यायकारक असल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. (No nutrition audit at school level primary teachers Commity letter to Commissioner of Education suraj mandhare Latest Marathi News)

सण 2015-16 ते सन 2019-20 या पाच वर्षांचे लेखापरीक्षण शाळांचे विशेष लेखापरीक्षकांमार्फत करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले असून त्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, उपशिक्षक यांना अध्यापनाचे काम बंद करून लेखे जमवाजमव करणे, ऑनलाईन माहिती भरणे तसेच ऑफ लाईन लेखे पंचायत समिती कडे जमा करणे हे गुंतागुंतीचे असणारे काम पुन्हा करावे लागणार आहे.

लेखापरिक्षण शाळा स्तरावर करण्याऐवजी ते तालुका स्तरावर पंचायत समितीत होणे गरजेचे आहे. कारण सर्व मुख्याध्यापक यांनी दरवर्षी शाळा स्तरावर शालेय पोषण आहार योजने अंतर्गत प्राप्त निधीची विनियोग दाखला पंचायत समिती स्तरावर जमा केला असून त्याची तपासणी दरवर्षी केली जाते.

त्यामुळे लेखापरिक्षण शाळा स्तरावर न करता तालुका स्तरावरुन गटशिक्षणाधिकारी, संबंधीत शालेय पोषण आहार अधिक्षक यांचेकडून माहिती प्राप्त करून घेण्यात यावी व लेखापरिक्षण तालुका स्तरावर करण्यात यावे. प्राथमिक शिक्षकांना त्यांचे अध्यापनाचे काम करु द्यावे असे शिक्षण आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

nashik latest marathi news
श्री भगवतीच्या मुर्ती संवर्धनास प्रारंभ; पहिल्या पायरीवर पर्यायी दर्शनाची व्यवस्था

कोविड-19 चा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यावर यावर्षी शाळा ऑफ लाईन सुरु झालेल्या आहेत. गेल्या एक महिन्यापासून अनेक उपक्रम शाळा स्तरावर राबविण्यात येत आहेत. त्यात शाळा बाह्य सर्वेक्षण, सेतू, डायट प्रशिक्षण, अध्ययन स्तर तपासणीचा समावेश आहे.

हे उपक्रम सांभाळून शिक्षकांना नियमित अध्यापन करणेसाठी वेळ मिळणे अवघड असल्याने सकारत्मक निर्णय त्यांना पोषण आहार लेखापरीक्षण करण्याचा जबाबदारीतून बाजूला ठेवावे यासाठी शिक्षक आयुक्तांकडे साकडे घालण्यात आले.

प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात, राज्य अध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस आबासाहेब जगताप, प्राथमिक शिक्षक समितीचे नेते काळू बोरसे, नाशिक जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर यांच्या उपस्थितीत श्री मांढरे यांना सदर निवेदन देण्यात आले.

nashik latest marathi news
RPF कडून 6 महिन्यांत 745 मुलांची सुटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()