Nashik News: ना अधिकारी ना संगणक नुसताच देखावा; नाशिकच्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची दुरवस्था!

CM eknath shinde
CM eknath shindeesakal
Updated on

नाशिक : मागील महिन्यात मोठ्या गाजावाजा जिल्हाधिकारी स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु करण्यात आला. मात्र कक्ष सुरु होऊन महिना झाली नाही तोच कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बदली होऊन संगणकही गायब झाले आहेत. परिणामी, हा कक्ष म्हणजे केवळ दिखावा उरला आहे. (no office computer Nashik CM secretariat room in state of disrepair Nashik News)

राज्यात तालुका आणि जिल्हा स्तरावरील तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने त्याच्या पाठपुराव्यासाठी आधी लोकशाही दिन सुरु झाला. कालांतराने विभागीय लोकशाही दिनाची कक्षाच्या रुंदावण्यात येऊन विभागीयस्तरावर आणि मंत्रालयस्तरावर लोकशाही दिन सुरू झाला आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री आणि सचिवालय कक्षाची कल्पना पुढे आली. राज्यात विभागीय स्तरावर सुरु झालेल्या कक्षात तक्रारीचा पाऊस पडू लागल्यानंतर जिल्हास्तरावर असे कक्ष सुरु झाले. नाशिकला मागील महिन्यात कक्ष सुरू झाला.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

CM eknath shinde
Nashik Crime: सासरच्या लोकांनी विधवेच्या तोंडाला काळं फासलं, गळ्यात चप्पलेचा हार घालत काढली धिंड!

मोठा गाजावाजा करीत सुरू झालेल्या या तक्रार कक्षात नागरिकांच्या तक्रारीचा पाऊस सुरु झाला. साधारण सव्वा ते दीड महिन्यात प्रतिदिन दोन ते तीन या सरासरीने विविध खात्यातील अव्यवस्थेविरोधात नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस सुरु झाला आहे. मात्र अशातच या कार्यालयातील महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या.

त्यांच्या जागेवर पुन्हा अधिकारी दिलेले नाहीत. कार्यालयाला नोंदीसाठी शासकीय कामकाजासाठी साधा संगणकही ठेवलेला नाही. तक्रारीची दखल घेण्यासाठी ज्या कार्यालयात अधिकारी नाही संगणक नाही. शिपाई नाही. कार्यालय उघडल्यानंतर ते साफ कर्मचाऱ्यांसाठी म्हणून एकच कर्मचारी आहे.

त्यामुळे कायम सुने सुने पडणाऱ्या या कार्यालयात जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांना विनाकारण चकरा मारण्याशिवाय काहीच हाती लागत नाही. जिथे तक्रार घ्यायला लोक नाही त्या तक्रारी मंत्रालयात जाणार कधी त्यावर निर्णय होणार कधी? असा प्रश्‍न आहे.

CM eknath shinde
Nashik News : ZP कर्मचारी स्पर्धांची लगीनघाई अन् अध्यक्ष चषकाला मिळेना मुहूर्त!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()