नाशिकमध्ये आता वॅक्सिन घेतलं नसेल तर सर्वच ठिकाणी No Entry

Corona
Coronaesakal
Updated on

नाशिक : ओमीक्रॉन (Omicron) व्हेरिएंन्टची टांगती तलवार लक्षात घेउन प्रशासाने उद्या गुरुवार (ता.२३) पासून नाशिक शहर-जिल्ह्यात लशीचा (Vaccine) एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना शासकीय- निमशासकीय कार्यालये, बाजार समित्या, खासगी आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी (ता.१६) झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. ओमीक्रॉन विषाणूचा प्रसार वेगाने होत असताना जिल्ह्यातील नागरिक लसीकरणासंदर्भात गंभीर दिसून येत नाही. शहरात म्युकरमायकोसीसच्या (Mucormycosis) रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी, तर मृत्यु दर २.११ टक्केच्या आत आलेला नाही. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर ०.८० टक्के आहे.

Corona
तुमचा श्‍वास लागतो? जाणून घ्या कोरोना-ओमिक्रॉनसंबंधीची 'ही' लक्षणे

किमान एक डोस तरी हवाच...

लशीचा पहिला डोस (First Dose) घेतलेल्यांची संख्या ४० लाख ५३ हजार असून त्याचे प्रमाण ७८ टक्के इतके आहे. तर वीस लाख ६३ हजार नागरिकांनी लशीचा दुसरा डोस (Second Dose) घेतला असून त्याचे टक्केवारी ४० इतकी आहे. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी नागरिक पुढे नसल्याने प्रशासन चिंतेत आहे. यापार्श्वभूमीवर लसीचा एकही डोस न घेतलेल्या व्यक्तींना यापुढे शासकीय कार्यालय, खासगी आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. या आदेशाची अंमलबजावणीची सर्वस्वी जबाबदारी ही त्या आस्थापनांची असून त्यात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित आस्थापनेच्या प्रमुखावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे गुरुवारपासून शहरात सगळीकडे नो लस नो एन्ट्रीची (No Vaccine No Entry) प्रभावीपणे अंमलबजावणी होईल. असे चित्र आहे.

येथे असेल No Vaccine No Entry

- हॉटेल, शॉपींग मॉल, लॉन्स मंगल कार्यालयात प्रवेश बंदी
- किमान एक डोस घेतलेल्यांनाच प्रवेशास मुभा
- सोशल डिन्स्टन्सिंगच्या (social distancing) नियमाचे पालन करणे बंधनकारक
- सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर प्रत्येकाला बंधनकारक

Corona
Novavax: नोव्हावॅक्स लस 90 टक्के कोविड संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी

पार्ट्यांना प्रतिबंध

ख्रिसमस (Christmas) व ३१ डिसेंबरच्या पार्टी आयोजन करणाऱ्या हॉटेल्स‌ व संस्थांनी प्रथम: परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. महापालिका- पोलिस व महसुल प्रशासनाने पार्टीच्या नियोजनासाठी कोरोना नियमांच्या पालनाबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आली का याची तपासणी करावी. अनियमितता आढळल्यास परवानगी देऊ नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()