Nashik Water Cut: शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद

Water Shortage
Water Shortageesakal
Updated on

Nashik Water Cut : गंगापूर, मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथे वीजविषयक कामे केली जाणार असल्याने शनिवारी (ता. १६) दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच रविवारी (ता. १७) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. (no Water supply in city on 16 dec nashik news)

मनपाचे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ किलोवॅट सातपूर व महिंद्रा या दोन फिडरवरून ३३ किलोवॅट हाय टेन्शन वीजपुरवठा घेण्यात आला आहे. पंपिंगद्वारे महापालिकेच्या बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्र यांना रॉ- वॉटरचा पुरवठा केला जातो.

पश्चिम वितरण विभागास प्रभाग क्रमांक १२ मधील नविन जलधारा वसाहत येथील २० लाख लिटर जलकुंभास बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्राचे आवारातून जोडणी करणे, विसे मळा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रोड १२०० मी. मी. पीएससी ग्रॅव्हिटी मेन रॉ वॉटर पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र येथे एमबीआर लाइनवर फ्लो मीटर बसविणे व पाणीपुरवठा वितरण विभागातील विविध ठिकाणचे दुरुस्तीची कामे केली जाणार आहे.

Water Shortage
Nashik MD Drug Case: शिंदेगाव एमडी कारखान्याचा मास्टरमाईंड ललितच! ललित-भूषणच्या चौकशीतून स्पष्ट

त्याचप्रमाणे मुकणे धरणावरील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथून एक्स्प्रेस फिडरवरदेखील काम केले जाणार आहे. त्यासाठी शनिवारी (ता. १६) सकाळी ९ ते सांयकाळी सहापर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.

त्यामुळे गंगापूर व मुकणे धरणातून पाणी पंपिंग करता येणार नसल्याने जलशुद्धीकरण केंद्र बंद राहणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवारी (ता. १६) बंद राहणार आहे.

Water Shortage
Nashik Water Crisis: पुरपाणी न मिळाल्याने ‘करला’ धरण कोरडेठाक! पाणीपुरवठा योजनांना पडणार मर्यादा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.