Ayodhya Ram Mandir : अयोध्या, कश्‍मिरसह पूर्वोत्तरला पर्यटकांची पसंती; भेट देण्याची आज अखेरची संधी

ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक (तान) यांच्‍यातर्फे हॉटेल ट्रीट (मनोहर गार्डन) येथे भरविलेल्‍या ट्रॅव्‍हल प्रदर्शनाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Citizens while visiting the exhibition organized by 'Tan' organization and getting information.
Citizens while visiting the exhibition organized by 'Tan' organization and getting information.esakal
Updated on

Ayodhya Ram Mandir : ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक (तान) यांच्‍यातर्फे हॉटेल ट्रीट (मनोहर गार्डन) येथे भरविलेल्‍या ट्रॅव्‍हल प्रदर्शनाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शनिवारी (ता.२०) प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यटकांनी प्रदर्शनाला भेट देत बुकींग केली. (Northeast along with Ayodhya Kashmir is tourist favorite place nashik news)

यात अयोध्या, जम्‍मू-कश्‍मिरसह पूर्वोत्तर राज्‍यांमध्ये पर्यटनास पर्यटकांचा कल असल्‍याचे यानिमित्त समोर आले. परदेशात दुबई, सिंगापूर या प्रचलित पर्यायांसोबत युरोप भेटीलाही पर्यटक पसंती देत आहेत.

आगामी सुट्यांचे नियोजन करता यावे व पर्यटनाच्‍या विविध पर्यायांची माहिती एका छताखाली उपलब्‍ध व्‍हावी, यासाठी ‘तान’तर्फे प्रदर्शन भरविले आहे. तीन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (ता.२१) शेवटचा दिवस आहे. यानिमित्त चारधाम संदर्भात मार्गदर्शनपर व्‍याख्यानाचे आयोजन केले जाणार आहे.

Citizens while visiting the exhibition organized by 'Tan' organization and getting information.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येसह अवघा देश झाला राममय; पाचव्या दिवशीही विविध विधी

तसेच तीन दिवसांत प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांपैकी भाग्‍यवंतांची निवड लकी ड्रॉच्‍या माध्यमातून होणार असून, त्‍यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. दरम्‍यान शनिवारी दिवसभरात नाशिककरांनी भेट देत उपलब्‍ध पर्यायांची माहिती जाणून घेतली. तसेच योजनांचा लाभ घेत काहींनी बुकींगही केली. यानिमित्त पासपोर्ट, विसासंदर्भातील मार्गदर्शन उपलब्‍ध करुन दिले आहे.

''गेल्‍या दोन दिवसांत नाशिककरांचा प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एकाच ठिकाणी भरपूर पर्याय सोबत आकर्षक योजना उपलब्‍ध झाल्‍याने ग्राहकांना दुहेरी फायदा होत आहे. तर बुकींग होत असल्‍याने व्‍यावसायिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. शेवटच्‍या दिवशी नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देत माहिती जाणून घ्यावी.''- सागर वाघचौरे, अध्यक्ष, ‘तान’

Citizens while visiting the exhibition organized by 'Tan' organization and getting information.
Ayodhya Ram Mandir : देशभरातील संत, महंतांचा जमलाय ‘कुंभमेळा’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()