आधी संरक्षक भिंत, त्यानंतरच बांधकाम परवानगी; नगररचना विभागाकडून नोटिस

NMC Building Permit latest marathi news
NMC Building Permit latest marathi newsesakal
Updated on

नाशिक : शहरात मोठ्या रस्त्यालगत बेसमेंटसाठी मोठ्या प्रमाणात खड्डे खोदल्याने त्यातून महापालिकेच्या (NMC) रस्ते, ड्रेनेज पाइपलाइन, पथदीप या मालमत्तांचे नुकसान होत आहे. खड्डे करताना प्रथम रिटेनिंग वॉल बांधावी, त्यानंतरच पुढील बांधकाम परवानगी देण्याच्या सूचना आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner ramesh pawar) यांनी केली. (Notice from town planning department to builders about building permit nashik latest news)

त्याअनुषंगाने नगररचना विभागामार्फत (town planning department) शहरातील सर्वच बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, ठक्कर बिल्डर्स व डेव्हलपर्सला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावताना आरडी सर्कल येथील काम पूर्ण होत नाही तोपर्यंत बांधकाम परवानगी रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रविवार व सोमवार असे दोन दिवस शहरात मुसळधार पाऊस झाला. सोमवारच्या पावसात गोविंदनगर ते सिटी सेंटर मॉल रस्त्यावरील आरडी सर्कल येथे रस्ता खचून महापालिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात आली, तर तातडीने खचलेल्या रस्त्यावर भराव टाकून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ठक्कर बिल्डर्स व डेव्हलपर्सच्या वतीने कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे काम सुरू असल्याने बेसमेंटसाठी खड्डा तयार करण्यात आला. खड्डा तयार केल्यानंतर संरक्षक भिंत तातडीने बांधणे अपेक्षित होते. भिंत तयार झाली असती, तर रस्ता खचला नसता. अशीच परिस्थिती शहरात सर्वच भागात आहे.

विशेष करून बारा, पंधरा व अठरा मीटर रस्त्यावर मोठ्या इमारती तयार करताना मोठे खड्डे तयार केले जात आहे. त्यातून रस्ते व ड्रेनेज असे महापालिकेच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने नगररचना, बांधकाम व ड्रेनेज विभागाकडून बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्याचे काम सुरू झाले आहे.

नवीन इमारतींसाठी बेसमेंटचे खोदकाम करताना सीटफाईलींग, सोर्सफाईलींग करून स्ट्रक्चर रिटेरींग करणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या ड्रेनेज, फुटपाथ, रस्ता अन्य घटकांचे नुकसान झाल्यास कारवाई केली जाणार आहे. बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेचे नुकसान होणार नाही यासंदर्भात काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

NMC Building Permit latest marathi news
Monsoon Update : राज्यात गेल्यावर्षीपेक्षा 9 टक्के अधिक पाऊस

ठक्कर डेव्हलपर्सवर दंडात्मक कारवाई

गोविंदनगर भागातील आरडी सर्कलजवळ दुहेरी बेसमेंटचे काम सुरू असल्याने फुटपाथ, ड्रेनेज, रस्ता, पाणी, पावसाळी गटारींचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ठक्कर बिल्डर्स व डेव्हलपर्सची येथील बांधकाम परवानगी रद्द करण्यात आली असून, रस्ता दुरुस्ती तसेच दंडात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.

रस्ता व महापालिकेच्या अन्य घटकांची दुरुस्ती होईपर्यंत बांधकामाची परवानगी रद्द करण्याच्या सूचना आयुक्त पवार यांनी दिल्या.

NMC Building Permit latest marathi news
Nashik : जिल्हा बँकेतर्फे 387 कोटींचे पीककर्ज 70 टक्के वाटप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.