NMC News : नांदेड जिल्हा सरकारी रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने तातडीने महापालिकेच्या रुग्णालयाचे फायर, इलेक्ट्रिकल व स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नांदेड व छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयामध्ये मागील मागील ४८ तासात २४ व त्यानंतर नव्याने सात रुग्ण मृत्यू पावल्याचे घटना घडली.
काही महिन्यांपूर्वी ठाण्याच्या कळवा रुग्णालयात अशीच घटना घडली होती. त्यात जवळपास १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. (Notice of NMC Hospital Audit Administration on alert mode due to Nanded incident nashik)
त्या पार्श्वभूमीवर नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. राजकीय पातळीवर शासकीय रुग्णालयांच्या स्थितीवरून धुमशान सुरू झाले आहे. यामुळे नाशिक महापालिका अलर्ट मोडवर आली आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेने यापूर्वीच नगर रचना व अग्निशमन विभागाला सादर केलेल्या पत्राचा आधार घेऊन तातडीने ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी महापालिकेच्या हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, कठडा येथील डॉ. झाकिर हुसैन रुग्णालय, मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय व पंचवटी कारंजा येथील इंदिरा गांधी रुग्णालय या रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रिकल व स्ट्रक्चर ऑडिट महिन्याभरात करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याचबरोबर खासगी रुग्णालयांनीदेखील स्ट्रक्चर ऑडिट करून तसे सर्टिफिकेट सादर करावे. रुग्णालयांमध्ये मोठी दुर्घटना घडल्यास रुग्णालय प्रमुखांवर कारवाई करण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.
घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील कर्मचारी वर्गाला २४ तास अलर्ट राहण्याच्या सूचनादेखील महापालिकेकडून करण्यात आल्या आहेत.
"संभाजीनगर व नांदेड येथील रुग्णालयाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिकल व फायर ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर व्हायरल, डेंगी आजाराच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा आहे."
- तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.