NHM Protest : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी नर्सेस तसेच कंत्राटी कर्मचारी यांचे रिक्त पदावर समायोजन करावे, यांसह प्रलंबित मागण्यांसाठी विभागातील कंत्राटी कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांचे १६ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने कर्मचारी, अधिकारी आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता.२४) जिल्हा परिषदेवर धडक देत, मागण्यांसाठी २८ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाला पत्र दिले आहे. ( Notice of strike action from Tuesday for pending demands by nhm Officers employees nashik news)
राष्ट्रीय अभियानांतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका, सहाय्यिका प्रयोग शाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदी संवर्गातील कंत्राटी कर्मचारी यांचे रिक्त जागांवर समायोजन केले जाईल, असे आश्वासन पाच महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. परंतु, अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्यावतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
याशिवाय समायोजन होत नाही, तोपर्यंत समान वेतन लागू करू नये, औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एनएचएम कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर सामावून घ्यावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ द्यावी, त्यांचे बदली धोरण तयार करावे, अशा मागण्यांसाठी संघटनेच्यावतीने १६ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३० व ३१ ऑक्टोंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत संवाद साधला होता. यात, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मागण्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात महिनाभर झालेल्या एकाही बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत निर्णय झालेला नाही. यासाठी विभागातील सर्व १०० टक्के कर्मचारी, अधिकारी यांनी आता आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेत धडक देऊन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र दिले. शासनाने अधिवेशनामध्ये मागण्यांबाबत निर्णय घ्यावा याकरिता सर्व कंत्राटी अधिकारी, कर्मचारी मंगळवारपासून (ता.२८) कामबंद आंदोलन करणार असल्याचे उद्धव हांडोरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. राहुल हाडपे, संदीप जाधव, सचिन सोनवणे, विशाल नायडू, भूषण देसले, अविनाश शिंदे, रवींद्र शिंदे, योगेश गडाख, विद्या जोशी, जयश्री पेखळे, प्रार्थना पगारे, सुवर्णा शेवाळे, वैशाली जाधव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.