Nashik News : मागासवर्गीय विद्यार्थ्यांची अडवणूक करू नका; पुणे विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांना सूचना

Pune University
Pune Universitysakal
Updated on

Nashik News : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्‍या शैक्षणिक कागदपत्रांची अडवणूक करू नये, शैक्षणिक शुल्‍क वसूल न करण्याच्‍या सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केल्‍या आहेत. यासंदर्भात परिपत्रक जारी करताना महाविद्यालयांना विद्यापीठाने तंबी दिली.

परिपत्रकात नमूद केल्‍यानुसार भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत संलग्‍नित महाविद्यालये व मान्‍यताप्राप्त शैक्षणिक संस्‍थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्‍त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. (Notice to all colleges of Pune University do not obstruct backward class students nashik news)

महाडीबीटी पोर्टलद्वारे शैक्षणिक शुल्‍क, परीक्षा शुल्‍क व इतर शुल्‍काची प्रतिपूर्ती केली जाते; परंतु शासनाकडून विलंबाने शिष्यवृत्ती प्राप्त होत असल्‍याने बऱ्याच शैक्षणिक संस्‍था विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्‍क वसूल करतात. व संबंधित विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे अडवत असल्‍याचे निदर्शनास आले आहे.

अशा प्रकारे शुल्‍क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाणार असल्‍याचे शासनातर्फे स्‍पष्ट करण्यात आले. विद्यापीठाकडून यासंदर्भात यापूर्वीच महाविद्यालयांना स्‍पष्ट सूचना दिल्‍या होत्‍या. यासंदर्भात आठवण करून देताना शुल्‍क न करण्याच्या सूचना विद्यापीठाने केल्‍या आहेत.

Pune University
Sakal Exclusive : ग्रामसभा व्हिडिओ अपलोड करण्यात ग्रामपंचायतींची कुचराई; 796 ग्रामपंचायतींनी फिरविली पाठ

अन्‍यथा कारवाईला सामोरे जावे लागेल

विद्यापीठाने ठरविलेल्‍या शुल्‍काप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनातर्फे अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्‍क, परीक्षा शुल्‍क व इतर शुल्‍काची प्रतिपूर्ती होते, अशा अभ्यासक्रमाच्‍या विद्यार्थ्यांकडून कोणत्‍याही परिस्‍थितीत शुल्‍क वसूल करू नये, असे अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालये व संस्‍थांना कळविले आहे.

तसेच, कागदपत्रांची अडवणूक करू नये. अन्‍यथा, तक्रार प्राप्त झाल्‍यास नियमानुसार संबंधित महाविद्यालयावर शासन, विद्यापीठ नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असेही पुणे विद्यापीठाने खडसावले आहे.

Pune University
Nashik News : माझ्या मुलाचा एन्काउंटर करू नये; संशयित पाटीलच्या आईचा माध्यमांशी संवाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.