नाशिक : हर घर जल से नल, या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर काम सुरू आहे. त्याअनुषंगाने २६ जानेवारी रोजीचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरातील १३८२ गावांत होणाऱ्या विशेष ग्रामसभांमध्ये जलजीवन योजनेबाबतची सविस्तर माहिती देण्यात यावी,
अशा सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सर्व ग्रामपंचायतींना पत्र देत सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हयात जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन अंतर्गत १२९२ योजनांचे कामे सुरू आहेत. मार्च २०२४ अखेर पर्यंत संपूर्ण जिल्हा हा हर घर नल से जल म्हणून घोषित करण्याचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे.
त्याच अनुषंगाने २६ जानेवारी आयोजित करत असलेल्या ग्रामसभांमध्ये या योजनेची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी असे आदेश आहे. ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करून विशेष स्थान देण्यात येऊन व समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थित ग्रामस्थांना अवगत करून द्यावे,
पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या पाच महिलांना सभेस आमंत्रित करून सन्मानित करावे, प्रत्येक गावातील पाणी गुणवत्ता निरीक्षक महिलांची संपर्क क्रमांकासहीत नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिद्ध करावे, पाण्याच्या नियमित तपासणीबाबतच्या कार्यपद्धतीची माहिती ग्रामसभेमध्ये द्यावी,
क्षेत्रीय तपासणी संच संचातून पाणी नमुना तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखवावे, क्षेत्रीय तपासणी संचच्या माध्यमातून महिलांव्दारे पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी व नळ जोडणीद्वारे येणाऱ्या पाण्याच्या नियमित तपासणीबाबतच्या कार्यपद्धतीची माहिती द्यावी, जल जीवन मिशनअंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती जसे योजनेचे उद्दिष्ट,
योजनेतील समाविष्ट उपांगे, मंजूर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, ठेकेदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यःस्थिती तसेच प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती देण्यात यावी अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या असल्याचे ग्रामपंचायतींचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.