Nashik Dengue News: डेंगी अळ्यांची उत्पत्ती स्थाने निर्माण केल्याने नाशिक रोड रेल्वेस्थानक प्रबंधकांना नोटीस

Notice News
Notice Newsesakal
Updated on

नाशिक : नाशिक रोड विभागातील गोसावीवाडीत सांडपाण्याच्या नाल्यावर तीन ठिकाणी अनधिकृतपणे बांध बांधून डेंगी अळ्यांची उत्पत्ती स्थाने निर्माण केल्याने नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या प्रबंधकांना नोटीस बजावली आहे.

आतापर्यंत एकूण १०५८ नागरिक व आस्थापनांना उत्पत्ती साधने निर्माण केल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. शहरात डेंगी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. ऑक्टोबरमध्ये १९३ डेंगी बाधितांची नोंद झाली. (Notice to Nashik Road Railway Station Manager due to creation of dengue breeding sites Nashik News)

नोव्हेंबरमध्ये तब्बल २७२ नवीन रुग्णांची भर पडली. डेंगीमुळे तीन जणांचा प्राण गेला. त्या पार्श्वभूमीवर मलेरिया विभाग अलर्ट मोडमध्ये आला असून, डेंगी उत्पत्ती साधनांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

नाशिक रोड रेल्वे स्टेशन भागातील गोसावीवाडी परिसरातून सांडपाण्याचा नाला जातो. रेल्वे प्रशासनाने या नाल्यावरच तीन ठिकाणी बंधारे बांधले.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डेंगी आळ्या आढळल्याने प्रबंधकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Notice News
Nashik Citylinc News: शंभर बसमुळे सिटीलिंकवर आणखी बोजा! महापालिकेला किलोमीटरमागे 40 ते 42 रुपये तोटा

डेंगीची उत्पत्ती साधने आढळलेल्या १५८ ठिकाणी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, त्या ठिकाणीदेखील सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

नगररचना विभागाने मंजुरी दिलेल्या बांधकामाच्या साईटचा अहवाल मागविण्यात आला असून, अर्धवट असलेल्या साईट्सवर सर्वेक्षण करून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. नितीन रावते यांनी दिली.

Notice News
Nashik News: देवळा तालुक्यातील गावे महसुली दर्जापासून वंचित! निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.