इथे मृत्यूदर वाढतोय; शहरातील नऊ रुग्णालयांना नोटिसा

hospitals
hospitalsesakal
Updated on

नाशिक : कोरोना दुसऱ्या लाटेमध्ये (corona second wave) रुग्णवाढीचा दर अधिक असल्याबरोबरच मृत्यूच्या दरातही मोठी वाढ दिसून येत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये (private hospitals) मृतांची संख्या अधिक असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील नऊ मोठ्या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. (notice to nine hospitals)

मृत्यूसंख्येचा वाढता आलेख चिंताजनक

फेब्रुवारी २०२१ अखेरपासून शहरामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग सहा ते आठपटीने होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मृत्यूसंख्यादेखील वाढली. शहरातील वाढत्या रुग्णसंख्याबरोबरच मृत्यूची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माहिती मागविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नाशिक शहरातील मृत्यूसंख्येचा वाढता आलेख चिंताजनक आहे. त्याव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या अधिक असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नऊ रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

hospitals
नाशिक जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णांच्या आकडेवारीत तफावत

ई-मेलद्वारे खुलासा करण्याचे आदेश

१ मार्च ते १४ मे २०२१ या काळातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त का आहे, मृत्युदर जास्त असणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याने संबंधित रुग्णालयांनी ई-मेलद्वारे खुलासा करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.

मृत्युदर अधिक असलेली रुग्णालय

शहरातील नामांकित अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, वोक्हार्ट हॉस्पिटल, सिक्स सिग्मा हॉस्पिटल, देवळाली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, देवळाली कॅम्प, सनसाईस हॉस्पिटल, श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल, नाशिक रुग्णालय नाशिक, त्रिमूर्ती हॉस्पिटल आणि गंगापूर रोडवरील श्रीगुरुजी रुग्णालयामध्ये मृत्युदर अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मृत्युदर वाढण्याची काय कारणे आहेत, याचा वैद्यकीय खुलासा नोटीसच्या माध्यमातून मागविण्यात आला आहे.

hospitals
"आधी लढाई जीवन मरणाची, मग हक्क अधिकारांची" - खासदार संभाजीराजे भोसले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.