Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागामार्फत सुरू असलेल्या प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या १५ अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मतदारदिनी निवडणूक कामकाजाबाबत प्रशिक्षण घेण्यात आले. (Notice to officials who are absent election training nashik lok sabha election news)
गैरहजर राहण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडील पूर्वपरवानगी घेतली नव्हती. निवडणूकविषयक अतिमहत्त्वाच्या कामकाजामध्ये बेजबाबदारपणा, हलगर्जी तसेच जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: आढावा घेतला.
यामुळे गैरहजर अधिकाऱ्यांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम १३४ अन्वये निवडणूक संबंधीच्या अधिकृत कर्तव्याचा भंग केल्याप्रकरणी कडक कार्यवाही का करू नये, याबाबतचा लेखी खुलासा दोन दिवसांत उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे समक्ष सादर करावा. समाधानकारक लेखी खुलासा मुदतीत प्राप्त न झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे.
अनुपस्थित राहणारे अधिकारी
मतदारसंघ अनुपस्थित अधिकाऱ्यांचे पद
नांदगाव शाखा अभियंता
मालेगाव बाह्य शिल्प निदेशक (आयटीआय)
कळवण/सुरगाणा मुख्याधिकारी / विस्तार अधिकारी
येवला निवासी नायब तहसीलदार
सिन्नर मंडळ अधिकारी
निफाड मुख्याधिकारी
नाशिक पूर्व मंडळ अधिकारी
नाशिक मध्य महसूल नायब तहसीलदार
नाशिक पश्चिम विभागीय अधिकारी / सहायक आयुक्त / गट निदेशक
देवळाली प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी / उपअभियंता
इगतपुरी/त्र्यंबकेश्वर गटविकास अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.