Nashik News : नगरपालिका काळापासून अस्तित्वात असलेली रविवार कारंजा येथील यशवंत मंडई धोकादायक स्थितीत आल्याने जमीनदोस्त करण्यासाठी २४ भाडेकरूंना २३ नोव्हेंबरपर्यंत मंडई खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
डिसेंबरमध्ये पाडण्याचे काम सुरू केले जाणार आहे. त्या जागेवर महापालिकेकडून बहुमजली पार्किंग उभारले जाणार आहे. धोकादायक यशवंत मंडईची महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी शनिवारी (ता.४) पाहणी केली.
नोटीस देवूनही इमारत खाली करणार नाही, त्यांचे साहित्य जप्त केले जाणार आहे. (Notice to tenants to vacate Yashwant Mandai by 23 November nashik news)
शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येत पार्किंग स्लॉटची संख्या मात्र अत्यंत कमी आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, तसेच मुख्य रस्त्यांवर वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडतात. यातून वाहनधारकांना मनस्ताप, हवा व ध्वनिप्रदूषण, वेळेचा अपव्यय, वाहतूक पोलिसांवर येणारा ताण या समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी महापालिका आयुक्त ‘मिशन पार्किंग’ मोहीम राबवीत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून नगरपालिका काळापासून असलेली इमारत जीर्ण झाल्याचा अहवाल सादर झाल्याने येथील २४ गाळेधारकांना महापालिकेने नोटीस पाठवून जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंडई जमीनदोस्त करून त्या जागेवर बहुमजली पार्किंग करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
परंतु नोटीस देवूनही गाळेधारक जागा खाली करत नसल्याने महापालिका आयुक्तांनी शनिवारी पाहणी केली. कर उपायुक्त श्रीकांत पवार, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त तथा पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेर उपस्थित होते. गाळेधारकांना तातडीने अंतिम नोटिसा बजावून सदर इमारत ३ नोव्हेंबरपर्यंत इमारत खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
डिसेंबरमध्ये इमारत पाडणार
यशवंत मंडई पाडून त्या जागेवर बहुमजली वाहनतळ उभारल्यानंतर रविवार कारंजावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. रविवार कारंजा हा परिसर मुख्य बाजारपेठेचा भाग आहे. त्यामुळे या भागात वाहनतळ उभारण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. माजी नगरसेविका स्व. सुरेखा भोसले यांनी बहुमजली पार्किंगसाठी आग्रह धरला होता. मंडईतील व्यापाऱ्यांना अंतिम नोटीस बजावली असून, त्यानंतर डिसेंबरमध्ये मंडई पाडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.