Nashik News: गटविकास अधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटिसा; त्र्यंबकेश्वर पंचायत समिती होती कुलूपबंद

trimbakeshwar Panchayat Samiti
trimbakeshwar Panchayat Samiti Sakal
Updated on

Nashik News : शासकीय कार्यालय सुरू करण्याची वेळ सकाळी पावणेदहा असताना सव्वादहापर्यंत त्र्यंबकेश्वर पंचायत समितीत कुलूपबंद होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या अचानक भेटीत हे चित्र होते. परदेशी पंचायत समितीत दाखल झाल्यावर केवळ एक विस्तार अधिकारी व शिपाई हजर होते.

कार्यालयाचे प्रमुख गटविकास अधिकारीही उपस्थित नव्हते. यातच कार्यालयाचे अभिलेखे हे पडक्या खोलीत पडल्याचे निदर्शनास आले.(Notices to Trimbakeshwar Panchayat Samiti Group Development Officers Officers Employees nashik news)

त्यावर संतप्त झालेल्या परदेशी यांनी गटविकास अधिकारी यांच्यासह गैरहजर असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गांच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा सुरू असलेल्या केंद्रावर उपमुख्यमंत्री परदेशी यांनी भेट दिली.

दोन परीक्षांमध्ये कालावधी असल्याने परदेशी यांनी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीला अचानक भेट दिली. त्या वेळी पंचायत समिती बंद असल्याचे दिसून आले. दहानंतर कार्यालय उघडण्यात आले. त्या वेळी एक शिपाई व विस्तार अधिकारी हजर होते. तब्बल पाऊण तासानंतर, गटविकास अधिकारी कार्यालयात दाखल झाले.

सकाळी साडेदहापर्यंत कार्यालयात केवळ १६ कर्मचारी हजर होते. त्यापैकी सात रोजगार हमी योजनेवरील कंत्राटी कर्मचारी होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांनी प्रवेशद्वारावर खुर्ची टाकत कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. पंचायत समितीतील सात विभागप्रमुखांपैकी एकही विभागप्रमुख हजर नसल्याचे निदर्शनास आले. सकाळी अकरापर्यंत २४ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

trimbakeshwar Panchayat Samiti
Swachh Bharat Mission: मान्यता जिल्हा परिषदेची; निविदा निघणार मंत्रालयातून

पडक्या खोलीत अभिलेखे

राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमध्ये अभियान राबविले जात आहे. या पंचायत समितीत अभियानात वर्गीकरण करण्यात आलेले अभिलेखे बंद खोलीत व्यवस्थित ठेवणे अपेक्षित होते. मात्र, हे महत्त्वाचे अभिलेखे पडक्या छत नसलेल्या खोलीत पडलेले दिसून आले. हे चित्र पाहून उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी संतप्त झाले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवत खडेबोल सुनावले.

"त्र्यंबकेश्वर पंचायत समितीला अचनाक भेट दिली असता तेथे गटविकास अधिकारी यांच्यासह विभागप्रमुख, कर्मचारी गैरहजर होते. कार्यालय वेळेत उघडण्यात आलेले नव्हते. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सविस्तरपणे कळविले आहे. या प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांसह गैरहजर अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जाणार आहेत." - रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

trimbakeshwar Panchayat Samiti
Chhagan Bhujbal: अन्याय होत असल्यास गप्प बसणार नाही : छगन भुजबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com