Market Committee Election : पिंपळगांव बाजार समिती निवडणुकीत भाजपची उडी

Market Committee Election
Market Committee Electionesakal
Updated on

पिंपळगांव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगांव बसवंत बाजार समितीची निवडणुक (Market Committee Election) दिलीप बनकर व अनिल कदम या आजी-माजी आमदारांच्या दोन गटात होणार असल्याचे वरवर चित्र असताना आता भारतीय जनता पार्टीनेही यात उडी घेतली आहे.

त्यामुळे येथील लढत दुरंगी होणार की तिरंगी याबाबत उत्सुकता आहे. (now BJP fight in Pimpalgaon market Committee elections nashik news)

पिंपळगांव बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या तालुका पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. आमदार बनकर व माजी आमदार कदम यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी व्युहरचना आखली असुन, संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

त्यासाठी सोसायटी व ग्रामपंचायत गटातील मतदारांच्या गुप्त भेटी-गाठी सुरू आहेत. यात आता नवा ट्वीस्ट आला असून, भाजपाच्या तालुका स्तरावरील नेत्यांनीही आखड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

त्यासाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणुक लढण्याचा निर्धार करण्यात आला. तालुकाध्यक्ष भागवतबाबा बोरस्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, अमृता पवार, सतीश मोरे, बापुसाहेब पाटील, जगन्नाथ पाटील, केशव सुरवाडे, संजय गाजरे, संजय वाबळे, आदेश सानप, अल्पेश पारख आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Market Committee Election
Market Committee Election : बिनविरोधची परंपरा टिकणार की खंडित होणार? पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष

स्वतंत्र लढणार की हातमिळवणी?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे पदाधिकारी पिंपळगांव बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पकड घट्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी तिसरा पॅनल उभा करून महत्त्व सिद्ध करण्याची धडपड सुरू आहे.

वास्तवीक बाजार समितीचे मतदार असलेल्या सोसायट्या व ग्रामपंचायतींचे मोजकेच संचालक भाजपकडे आहेत. त्यामुळे अर्ज दाखल केले, तरी भाजपचे नेते स्वतंत्र लढतील का, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे बार्गेनिंग पॉवर वाढवुन आजी-माजी आमदारांच्या गटाशी भाजप नेते जुळवुन घेतील, अशीच शक्यता अधिक आहे.

सहा सोसायट्या रद्द झाल्याने चित्र बदलणार

आमदार बनकर यांनी सहा सोसायट्यांची निर्मिती करून सुमारे ७८ मते वाढवुन बाजु भक्कम केली होती. पण, त्यावर कुरघोडी करत माजी आमदार कदम यांनी मोठ्या कौशल्याने त्या रद्द केल्या. यामुळे पिंपळगांव बाजार समितीच्या सोसायटी गटातील अकरा जागांच्या लढतीचे समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत.

आजही वरकरणी आमदार बनकर यांचेच सोसायटीवर गटावर वर्चस्व दिसत असले, तरी क्रॉस व्होटींग नाकारता येत नाही. पण, सहा सोसायट्यांचा वाद न्याय प्रविष्ठ असून, त्याच्या निकालावरच निवडणुकीचा रंग अवलंबुन आहे.

Market Committee Election
Dada Bhuse News: पालकमंत्री भुसे यांनी केलेला विकास विरोधकांच्या डोळ्यात खुपतो - नीलेश आहेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.