नाशिक : पर्यटकांवर आता सीसीटीव्हीची नजर

अकोलेतील दुर्गम वाघदरीत हायटेक फॉरेस्ट चेकनाका
 CCTV
CCTV sakal
Updated on

अकोले : तालुक्यातील हरिश्चंद्र गड(harishchandragad) अभयारण्य परिसरात आता सीसीटीव्ही कॅमेरे (cctv camera)व नेटवर्किंग मार्फत पर्यटक, वन्य जीवांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. वाघ दरी येथे हायटेक फॉरेस्ट चेक नाका (forest check point)सुरू करण्यात आला आहे. लवकरच कळसूबाई अभयारण्यात असे चेक नाके करण्यात येणार आहे. त्यासाठी बीएसएनएलच्या एअर फायबर इंटरनेटचे तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे, अशी माहिती सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली

 CCTV
पुण्याच्या लोहगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी संरक्षण मंत्र्यांना साकडं

हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरातील हरिश्चंद्रगड, कुमशेतचा कोकणकडा, डोंगररांगा, कात्राबाईची खिंड, घनचक्कर, शिरपुंजेचा भैरवगड आदी परिसरात पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. मात्र या परिसरात कुठल्याही कंपनीचे मोबाईल नेटवर्क नाही. कोणाशी मोबाईलद्वारे संपर्क साधावयाचा असेल, तर कुठेतरी डोंगराचा, टेकडीचा किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणाचा आधार घ्यावा लागत असे. तसेच पर्यटकांवर अंकुश ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना वा अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत असे. आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याने पोलिसांचे काम ही सोपे होणार आहे.

 CCTV
नाशिक : महापालिका शिक्षकांचा दिल्‍ली अभ्यास दौऱ्यात सहभाग

नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर व कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल डी. डी. पडवळे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी राजूर वनपरिक्षेत्र अंतर्गत असणाऱ्या हरिश्चंद्रगड अभयारण्य प्रवेशद्वाराजवळ वाघदरी सारख्या दुर्गम ठिकाणी नैसर्गिक संसाधनाची मदत घेऊन हायटेक नाका तयार केला आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सोलर सिस्टीमवर विजेचे दिवे कार्यान्वित करण्यात आले आहेत. नाक्यावर कॅशलेस सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे हा नाका हायटेक झाला आहे.वनक्षेत्रपाल पडवळे यांच्या नियंत्रणाखाली वनपाल शंकर लांडे, वनरक्षक जी. बी. पालवी, गोविंदा आढळ, भोराबाई खाडे, अविनाश भोये, नीलेश पिचड हे काम पाहत आहेत. नेटवर्किंगसाठी प्रदीप गोडे यांनी विशेष काम केले

 CCTV
पत्रकारांनी वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी ; उत्तम दिघे

हायटेक चेकनाक्यामुळे अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या-जाणाऱ्या अनियंत्रित पर्यटकांना लगाम लागला आहे. एखादा अनुचित प्रकार घडला, तर तो या माध्यमातून समजणे सोपे झाले आहे. पर्यटकांची व इतर नागरिकांची माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून राजूर येथील वन्यजीव विभागाच्या एलईडी दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्येही येथील घटना घडामोडी दिसत आहेत.

- गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक वन्यजीव विभाग, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.