Nashik | आता ॲपद्वारे मिळणार पाणीपट्टी बिल

Now you will get water bill through app
Now you will get water bill through appesakal
Updated on

नाशिक : वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी केल्‍यानंतरही महापालिकेला (NMC) पाणीपट्टी वसुलीत अडचणींचा सामना करावा लागतो. महापालिका क्षेत्रात सुमारे दोन लाख दहा हजार नळजोडण्या आहेत, परंतु काहींकडून वेळीच देयके अदा केली जात नसल्‍याने कोट्यवधींची थकबाकी रखडते. अशात नागरिकांमधील दुवा कमी करताना महापालिकेतर्फे विशेष ॲप (Application) साकारण्यात आले आहे. या ॲपद्वारे थेट व्‍हॉटस ॲपवर (Whatsapp) महापालिकेची बिले पाठविली जाणार आहेत. तसेच, नागरिकांनाही ॲपचा वापर करताना पाणीपट्टी बिलाची (Water bill) रक्‍कम ऑनलाइन (Online) स्वरूपात अदा करण्याची सुविधा उपलब्‍ध होणार आहे. महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक रमेश पवार यांच्‍याकडे यासंदर्भात सादरीकरण होऊन औपचारिक घोषणा केली जाणार आहे.

महापालिकेतर्फे विकसित केलेल्‍या या ॲपच्‍या माध्यमातून नागरीकांना पाणी मीटरचे रीडिंग नोंदवून बिलाची मोजणी करण्याची सुविधा उपलब्‍ध असेल. तसेच व्‍हॉट्‌स ॲप, ई- मेलच्‍या (Email) माध्यमातून नागरीकांना बिल प्राप्त करून घेता येणार आहे. सद्यःस्‍थितीत महापालिका क्षेत्रात दोन लाख दहा हजार नळ जोडण्या असून, घरगुती नळजोडणीधारकांना दर दोन महिन्यांनी आणि व्यावसायिक नळ जोडणीधारकांना दर चार महिन्यांनी पाणीपट्टीची बिले दिली जायला हवीत. महापालिकेच्‍या कर विभागामध्ये सुमारे शंभर कर्मचारी असून, त्‍यांच्‍यावर पाणीपट्टीसोबत घरपट्टी (Homestead) वसुलीचीही जबाबदारी असते. अशात कर्मचाऱ्यांच्या मर्यादित क्षमतेमुळे पूर्ण क्षमेतेने वसुली होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी चार, सहा वर्षे उलटूनही पाणीपट्टी देयके मिळू शकलेली नाहीत. वेळेवर बिले पोचत नसल्‍याने वसुलीसाठीही विलंब होतो. अशात ॲपचा प्रभावी वापर करताना ही गैरसोय टाळली जाणार आहे.

Now you will get water bill through app
सत्तेसाठी फडणवीसांचा जीव गुदमरतोय, 'या' नेत्याने केली टीका

असा करता येईल वापर
नळजोडणीधारकांना पाणी मीटरचे छायाचित्र काढून ॲपवर अपलोड करावे लागेल. यानंतर ॲपद्वारे तत्काळ पाणीपट्टीची मोजणी होत बिल मिळू शकेल. याशिवाय ॲपच्‍या माध्यमातून महापालिका कर्मचारीदेखील बिलाची आकारणी करू शकतील. हा ॲप जीपीएसशी (GPS) संलग्‍न असल्‍यामुळे मीटर रिंडींगचा घोटाळा करता येणार नाही. देयके अदा करण्याची सुविधादेखील उपलब्‍ध असेल.

Now you will get water bill through app
बालविवाहविरोधात काम करण्याची गरज : डॉ. प्रमोद पांढरे

"पाणीपट्टीसंदर्भातील ॲप साकारण्यात आले असून, महापालिका आयुक्‍त रमेश जाधव यांना सादर केले जाणार आहे. यानंतर त्‍यांच्‍या सूचनांनुसार दुरुस्‍तीनंतर ॲप सर्वसामान्‍यांना उपलब्‍ध करून दिले जाईल."
- अर्चना तांबे, उपायुक्‍त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.