Nashik Railway Station: रेल्वे स्थानकावर वाढवणार CCTV कॅमेऱ्यांची संख्या! गुन्हेगारांवर असणार करडी नजर

उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे समजले जाणारे नाशिक रोड रेल्वेस्टेशन येथे सध्या नवनवीन हायटेक सेवा देण्यासाठी बदल सुरू आहेत.
Passengers crossing the tracks at a railway station.
Passengers crossing the tracks at a railway station. esakal
Updated on

नाशिक रोड : उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे समजले जाणारे नाशिक रोड रेल्वेस्टेशन येथे सध्या नवनवीन हायटेक सेवा देण्यासाठी बदल सुरू आहेत.

त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणार असल्याचे स्टेशन मास्तर मनोज कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. गुन्हेगारीला आळा बसावा आणि सुरक्षेचा उपाय म्हणून कॅमेऱ्यांची संख्या वाढवणार आहे. (number of CCTV cameras will increase at nashik road railway station watch on criminals)

संभाव्य गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी रेल्वे स्थानकावर सध्या बहात्तर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. मात्र या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अजून काही कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे येणाऱ्या महिनाभरात कार्यरत होऊ शकतात.

त्यामुळे आवश्यकता असेल तेथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संख्या वाढवली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची क्षमता वाढवण्याचा विचार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथे काही गाड्या थांबत असल्यामुळे तो कार्यरत आहे.

त्यामुळे या ठिकाणी कॅमेऱ्यांची संख्या वाढवणार आहे. रेल्वे स्थानकाला सध्या नवीन लूक दिला जात आहे. या ठिकाणी असणारी प्रीमिअम पार्किंग बंद करून या ठिकाणी फुटपाथ बांधले आहेत.

त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे येणारा कुंभमेळा आणि सुरक्षेच्या उपाययोजना ग्राह्य धरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची क्षमता आणि संख्या वाढवणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.

Passengers crossing the tracks at a railway station.
Nashik News : उड्डाणपुलाच्या कामावरील कामगारांची सुरक्षितता वाऱ्यावर; जीव धोक्यात घालून करताय काम

रूळ ओलांडणाऱ्यांवर आजपासून कारवाई

रेल्वे स्थानकावर वारंवार सूचना देऊनही रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होताना दिसल्यामुळे आरपीएफसह रेल्वे पोलिस अलर्ट झाले आहेत. नाशिक रोड रेल्वेस्थानकावर सध्या नाशिकचे स्थानिक प्रवासी रूळ ओलांडताना दिसतात.

सूचना देऊनही त्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आरपीएफच्या जवानांसह रेल्वे पोलिस अशा रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर आजपासून करडी नजर ठेवणार आहेत. अनेकवेळा रूळ ओलांडताना लहान-मोठे अपघात होतात.

अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे आजपासून रोड ओलांडणाऱ्यांना कडक शासन केले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

Passengers crossing the tracks at a railway station.
Nashik NAMO Chashak : नमो चषक स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्मिती : डॉ. राहुल रनाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.