नाशिक : गेल्या महिन्याभरापासून सातत्याने दैनंदिन कोरोना बाधितांची (Corona Patients) संख्या वाढत आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली तरी तुलनेत कमी असल्याने सक्रिय रुग्णसंख्या वाढते आहे. जिल्हास्तरावरील हा आकडा आता तीनशेच्या उंबरठ्यावर आहे. गुरुवारी (ता.३०) जिल्ह्यात साठ रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आले. ४८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. सद्यःस्थितीत जिल्ह्यात २८० बाधितांवर उपचार सुरु आहेत. (number of corona active patients is near 300 in city Nashik Corona Update News)
गुरुवारी नाशिक महापालिका क्षेत्रात ४३, नाशिक ग्रामीणमध्ये तेरा, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एक, आणि जिल्हा बाहेरील तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली. सध्या उपचार घेत असलेल्या बाधितांपैकी सर्वाधिक १९२ बाधित नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. नाशिक ग्रामीणमधील सत्तर, मालेगावचे आठ व जिल्हा बाहेरील दहा बाधितांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर ३.१५ टक्के राहिला. यात सर्वाधिक ६.५६ टक्के दर हा नाशिक महापालिका क्षेत्रातील होता. सायंकाळी उशिरापर्यंत ७३८ रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक ६१७ अहवाल नाशिक ग्रामीण भागातील होते. तर नाशिक शहरातील ८७, मालेगाव महापालिका क्षेत्रातील ३४ रुग्णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.