जिल्ह्यात मराठी शाळांना मिळतेय पसंती; पटसंख्येत दुपटीने वाढ

 school
schoolGoogle
Updated on

दाभाडी (जि. नाशिक) : कोरोनापूर्व काळात पटसंख्येअभावी संघर्ष करणाऱ्या जिल्ह्यातील मराठी शाळांत उपस्थिती वाढली आहे. इंग्रजी शाळेसाठी प्रवास आणि शुल्क कोरोनात अवघड असल्याने हा बदल घडून आला आहे. त्याचा फायदा मराठी शाळांना झाला आहे. स्वयंअर्थसहाय्यावर विसंबलेल्या इंग्रजी शाळांचे चालक व कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. (number of students in Marathi medium schools in Nashik district has doubled)


पालकवर्ग प्राथमिक शाळांना वयानुरूप पटनोंदणीत प्राधान्यक्रम देत आहेत. शाळांची घंटा अद्याप वाजलेली नाही, मात्र पटसंख्या सुखावणारी ठरते आहे. शहरालगतच्या गावात वर्गनिहाय पट तब्बल दुपटीने वाढला आहे. इंग्रजी शाळांतील कल आता प्राथमिक शाळांकडे केंद्रित झाल्याने हे चित्र प्राथमिक शाळांसाठी उत्साहवर्धक ठरते आहे. मराठी शाळेतील शिक्षक-शिक्षिका सध्या थेट वाडी-वस्तीवर जाऊन अध्यापन करत असल्याने पालकांचा विश्वास कमावला आहे. त्याचेच फलित म्हणून प्रवेशाची संख्या वाढली आहे. यापूर्वी इंग्रजी शाळांनी ज्या गावात वाहतूक व्यवस्था कार्यान्वित केली होती, त्या गावातील प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी आचके देत होत्या. अत्यल्प पटावर मराठी शाळा टिकून होत्या. शाळांना जास्तीच्या प्रवेशाने सुखद धक्का दिल्याचे चित्र आहे. मोठ्या संख्येने पालकवर्ग पाल्यांचे इंग्रजी शाळेतून दाखले काढून घेत आहेत. शाळेची घंटा वाजल्यावर मराठी शाळेचे आवार आता गजबलेले असेल या जाणिवेने शिक्षक वर्ग सुखावला आहे.


इंग्रजी शाळा आर्थिक संकटात

शहरी व निमशहरी भागात मोठ्या खर्चातून उभ्या राहिलेल्या व विविध बोर्डाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या इंग्रजी शाळा आर्थिक संकटात सापडल्या आहेत. पूर्णतः विद्यार्थ्यांच्या शुल्कावर विसंबून असल्याने शाळा बंद असल्याने आर्थिकपुरवठा बंद झाला आहे. शाळाचालकांवर कर्जाचा डोंगर, कर्मचाऱ्यांची वेतनाअभावी उपासमार हे प्रश्न निर्माण झाले आहेत. इंग्रजी शाळांचा मोठा आर्थिक डोलारा सांभाळायचे अवघड संकट कोरोना काळात उभे ठाकले आहे. चालक आणि कर्मचारी यांची अवस्था दयनीय बनली आहे.

 school
चांगली बातमी! नाशिक शहर बससेवेच्या ट्रायल रनला सुरवात


मराठी शाळांची जबाबदारी वाढली

मराठी शाळांना नवी संधी मिळाली आहे. प्राथमिक शाळांना नव्या स्पर्धेसाठी भौतिक सुविधांची जमवाजमव करावी लागणार आहे. सेमी वा इंग्रजी माध्यमाला तिलांजली देणारा विद्यार्थी मराठी माध्यमात रमण्यासाठी व्यवस्थापनात बदल करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. प्राथमिक शाळांना कोरोनाने नवी संधी प्रदान केली आहे.


जिल्ह्यात प्राथमिक शाळांत पटसंख्या वाढते आहे. इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील.
- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, नाशिक

तालुक्यातील मोठ्या गावांत विद्यार्थ्यांची संख्या आश्चर्यकारक वाढली आहे. यामुळे आता शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे.
- टी. के. घोंगडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, मालेगाव

(number of students in Marathi medium schools in Nashik district has doubled)

 school
पोटच्या पोरीप्रमाणे गाईचं डोहाळं जेवण! गावाकडून गोड कौतुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()