Nashik : नूतन विद्या प्रसारक मंडळाचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Health Checkup Camp
Health Checkup Campesakal
Updated on

नाशिक : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने २६ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर २०२२ दरम्यान 'माता सुरक्षित तर, घर सुरक्षित' अभियानांतर्गत १८ वर्षा वरील महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्र उत्सव कालावधीत दि. ०३ व ०४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान नूतन विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व लासलगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्तविद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. (Nutan Vidya Prasarak Mandal health checkup camp concluded Nashik Latest Marathi News)

शिबिरात प्रथम प्रत्येक विद्यार्थ्यांनीची महिला डॉक्टर मार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. औषध उपचार करण्यात आला. विद्यार्थ्यांनीच्या रक्ताच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. आरोग्य तपासणी सत्रा नंतर समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले. समुपदेशन सत्रात लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण आहिरे यांनी भविष्यात सुदृढ माता होण्यासाठी १८ वर्षा वरील विद्यार्थ्यांनीची शारीरिक व प्रजनन संस्थेची योग्यरीतीने वाढ होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आपल्या आरोग्यासाठी कोणता आहार असावा यावर सखोल मार्गदर्शन केले.

स्त्रीरोग तज्ञ डॉ.मयुरी कानडे यांनी महिलांच्या मासिक पाळीचे सुदृढ मातृत्वासाठी शारीरिक महत्व सांगितले. मासिक पाळी दरम्यान शरीरातील ग्रंथीमार्फत प्रजनन संस्थेत होणाऱ्या बदलांची माहिती दिली. अनियमित मासिकपाळीमुळे भविष्यात गर्भधारणा होण्यात येणाऱ्या अडचणीबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

Health Checkup Camp
National Disinfectant Day : NMCच्या वतीने जंतुनाशक गोळी वाटप

समुपदेशन सत्राच्या अदयक्षीय समारोपात महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मिलिंद साळुंके यांनी ग्रामीण रुग्णालयातील मोफत दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा व केल्या जाणाऱ्या विविध रक्तचाचण्या करून घेण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीच्या मासिक पाळीत अनियमितता असेल व अंडाशय कार्यात काही अडचणी असतील तर ती भविष्यात धोक्याची घंटा आहे, असे समजून त्याबद्दल योग्य उपचार करावा असे मार्गदर्शन केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी नूतन विद्या प्रसारक मंडळाचे, सेक्रेटरी मा. तात्यासाहेब गोविंदराव होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य मा. दिनेश नाईक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. शिबिरात विद्यार्थ्यांनीच्या रक्त तपासणीसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. त्र्यंबक वाडीतके, प्रणाली पाटील, पूनम आंबोरे व मंगेश कुवर यांचे सहकार्य लाभले. समुपदेशन सत्राचे प्रास्ताविक श्री. आर. बी. तनपुरे यांनी केले. शिबीर यशस्वीरीत्या पारपाडण्यासाठी प्रा. मारोती कंधारे, डॉ. प्रदीप सोनवणे, डॉ. उज्वला शेळके यीन महाविद्यालयीन अध्यक्ष सुदर्शन नवले महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, तेजस्विनी गायकवाड, साक्षी वाघचौरे व ऋतुजा सोमवंशी लासलगाव ग्रामीण रुग्णालयचे कार्यालयीन कर्मचारी व रुग्णवाहिका चालक श्री. माठा भाऊ यांनी सर्वोतोपरी मदत केली.

Health Checkup Camp
अपेक्षा पालकमंत्र्यांकडून : घरे Free Hold होणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.