Nashik Crime News : बंदी झुगारून नायलॉन मांजा विक्री भोवली; 42 जण तडीपार

डीजेमुक्तीच्या धर्तीवर नायलॉन मांजाविरहित संक्रांत साजरी करण्याचे पर्यावरण प्रेमी व पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
crime
crimeesakal
Updated on

Nashik Crime News : डीजेमुक्तीच्या धर्तीवर नायलॉन मांजाविरहित संक्रांत साजरी करण्याचे पर्यावरण प्रेमी व पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

शाळा-महाविद्यालयांमध्ये नायलॉन मांजाचा वापर न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात असून, पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून बंदीचे आदेश असतानाही शहरात चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री सर्रासपणे सुरू आहे. (Nylon manja was sold in defiance of ban in city nashik crime news)

पोलिस आयुक्तांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने नायलॉन मांजा विक्री करणार्या ४२ जणांवर तडीपारीचा बडगा उगारण्यात आला असून, वापरकर्त्यांनाही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय हरितलवादाने नायलॉन मांजावर वापरावर बंदी घातली असून, मुंबई उच्च न्यायालयानेही कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत.

असे असतानाही शहरातच नव्हे तर राज्यभर नायलॉन मांज्याची सर्रासपणे चोरी-छुप्यारितीने विक्री होते आहे. पतंगप्रेमी त्याचा वापरही करीत आहेत. पोलिस यंत्रणेकडून छापे टाकून कारवाई आणि गुन्हेही दाखल केले जातात. तरीही नायलॉन मांजाची विक्री थांबलेली नाही. उलट चोरीच्या मार्गाने विक्री होतेच आहे. या मांजाच्या अतिरेकी वापरामुळे मुक्‍या भावना असलेल्या पशुपक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो तर अनेक दुचाकी-सायकलस्वारांच्या जीवावर बेतलेले आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात तडीपारीचा इशारा दिला होता. त्यानुसार, आयुक्तालय हद्दीतून ४२ जणांना तडीपार करण्यात आले आहे. यात सर्वाधिक तडीपार परिमंडळ एकमधून ३० तर सरकारवाडा विभागातून सर्वाधिक २३ तडीपारांचा समावेश आहे.

पोलीसांच्या या कारवाईमुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांना दणका बसला असला तरीही शहरात नायलॉन मांजांची विक्री केली जाते. परिमंडळ एकमध्ये उपायुक्त किरणकुमार चव्हाण व परिमंडळ दोनमध्ये उपायुक्त मोनिका राऊत यांच्या आदेशानुसार या ४२ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

crime
Nashik Crime News : थर्टी-फस्टच्या पूर्वसंध्येला शहरात अवैध मद्यविक्रीवर छापे

सर्रास विक्रीची ठिकाणे

जुने नाशिक परिसरातील भद्रकालीमध्ये नायलॉन मांजाची चोरीछुप्या परंतु सर्रास विक्री होते. दरवर्षी सक्रांतीपूर्वी पोलीस कारवाई करीत लाखोंचा नायलॉन मांजा जप्त करतात. सिडको, नाशिकरोड, भद्रकाली याच ठिकाणी नायलॉन मांजांची बिनधास्त विक्री चालते. जेलरोड, जुने नाशिक, भद्रकाली, सिडको, वडाळागाव, नाशिकरोड, टाकळीरोड या परिसरामध्ये नायलॉन मांजाचा पतंग प्रेमींकडून वापर करून मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात.

पोलिसांचा इशारा

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा उगारल्यानंतर पोलिस आता वापरकर्त्यांवरही कारवाई करणार आहेत. विशेषत: लहान मुलांकडे पतंग उडविताना नायलॉन मांजा आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

विभाग..........तडीपार

पंचवटी .........०७

सरकारवाडा ....२३

अंबड.........०६

नाशिकरोड ........०६

एकूण : .........४२

crime
Nashik Crime News : अपघातग्रस्त पिकअपमधून मांस जप्त

पोलीस ठाणेनिहाय कारवाई

आडगाव ......... 03

म्हसरूळ ......... 02

पंचवटी ....... 02

भद्रकाली ........ 05

सरकारवाडा ........ 08

गंगापूर ........ 05

मुंबईनाका ........ 05

सातपुर ......... 01

अंबड .......... 02

इंदिरानगर ......... 03

उपनगर ......... 03

नाशिकरोड .......... 02

देवळाली कॅम्प ........ 01

एकूण .......... 42

''नायलॉन मांजा विक्रीवर जशी बंदी आहे, तशी त्याचा वापर करण्यावरही बंदी आहे. त्यामुळे कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.''- किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१

crime
Nashik Crime News : मालेगावात 4 ठिकाणी 35 हजाराचा गुटखा जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.