जुने नाशिक : भद्रकाली गुन्हे शोध पथकाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली. २८ हजारांचा नायलॉन मांजा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रोहित रमेश साळवे (रा. कुंभारवाडा) असे संशयिताचे नाव आहे. गुन्हे शोध पथकाचे पोलिस कर्मचारी धनंजय हासे यांना कुंभारवाडा परिसरात एकजण बेकायदेशीररीत्या नायलॉन मांजा विक्रीस घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. (Nylon manja worth 28 thousand seized from Bhadrakali crime investigation team nashik crime news)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस कर्मचारी रमेश कोळी, धनंजय हासे, लक्ष्मण ठेपणे यांनी रविवारी (ता. २५) सायंकाळच्या सुमारास कुंभारवाडा येथे जाऊन खात्री केली. संशयित साळवे कुंभारवाडा येथून नायलॉन मांजाच्या गट्टूने भरलेल्या दोन प्लॅस्टिक पिशव्या घेऊन जात असल्याचे आढळून आले.
पथकाने कारवाई करत त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून मोनो काईट, मोनो गोल्डन आणि हिरो कंपनीचा असे तीन विविध प्रकारचे सुमारे २८ हजार रुपयांचे नॉयलॉन मांजाचे ५० गट्टू हस्तगत केले. धोकादायक नायलॉन मांजा विक्रीस जिल्हा, तसेच पोलिस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.
असे असताना संशयिताने इतरांच्या जीविताची पर्वा न करता बेकायदेशीररीत्या नायलॉन मांजा बाळगून विक्री करण्यास जात असल्याचे आढळून आले. त्याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेशित केल्याप्रमाणे संशयितावर कारवाई करण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.