नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये नायलॉन मांजा विक्री व वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच विक्री करणाऱ्यावर तडीपारीची कारवाईदेखील सुरू आहे.
असे असतानाही शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १ लाख ७२ हजारांचा २१५ नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले आहेत.
याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Nylon manja worth two lakh seized two arrested by Unit One of City Crime Branch Nashik crime)
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिसूचना जारी करीत शहर आयुक्तालय हद्दीमध्ये नायलॉन मांजा विक्री व वापरावर बंदी घातलेली आहे. तसेच, आत्तापर्यंत केलेल्या कारवाईतील ४२ जणांना वीस दिवसांसाठी तडीपारही करण्यात आले आहे.
असे असतानाही, शहरात चोरीछुप्यारितीने नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. युनिट एकचे अंमलदार नितीन जगताप, विलास चारोस्कर यांना मुंबई नाका परिसरामध्ये नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी संशयित येणार असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार, पोलिसांनी बजाज शोरुमच्या पाठीमागे असलेल्या हरिविहार सोसायटीजवळ असलेल्या चहाच्या टपरी येथे आलेल्या संशयित अरबाज फिरोज शेख (२४, रा. भद्रकाली, जुने नाशिक) यास अटक केली. त्याच्याकडून १ लाख ७२ हजार रुपयांचे नायलॉन मांजाचे २१५ गट्टू जप्त केले.
मोनो फाईटर, मोनो काईट, गो इंडिया गो कंपनीचे नायलॉन मांजाचे गट्टू होते. सदरचा नायलॉन मांजा संशयित शेख याने मुंबईतील अहमद हुसून जहीद काझी (रा. बांद्रा, मुंबई) याच्याकडून आणल्याचे सांगितले.
याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शेख याच्यावर यापूर्वीही अंबड पोलिसात नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आल्याने गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, मिलिंद परदेशी, राजेश राठोड, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर यांनी बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.