Nashik : मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस

NMC
NMCesakal
Updated on

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी (NMC election) जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर (Draft Voter list) हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला. शेवटच्या दिवसांपर्यंत तब्बल २७२५ हरकती नोंदविण्यात आल्याने मतदारयादीबाबत नागरिकांचा रोष या निमित्ताने स्पष्ट झाला आहे. दरम्यान राज्यात सर्वाधिक हरकती नाशिकमध्ये नोंदवल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. (objections on draft voter lists nmc election Nashik News)

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेतर्फे २३ जूनला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्या. याद्या प्रसिद्धीलाच प्रशासकीय यंत्रणेचा गलथानपणा समोर आला. संकेतस्थळावर उशिराने मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे हरकती व सूचना मांडण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवक व राजकीय पक्षांनी महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्याकडे केली. राज्य निवडणूक आयोगाला विनंती केल्यानंतर ३ जुलैपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. मुदत वाढून देताना सुट्टीच्या दिवशी देखील हरकत नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. आज अखेरपर्यंत सहा विभागात तब्बल २७२५ हरकती नोंदविण्यात आल्या.

एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करणे विशेष म्हणजे प्रभागाच्या हद्दीतील नावांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबडी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शेवटच्या दिवशी तब्बल ८५० तक्रारी प्राप्त झाल्या त्यापूर्वी शनिवारी ८११ हरकती प्राप्त झाल्या होत्या. दोन दिवसात एकूण तक्रारींच्या दुप्पट हरकती व सूचना प्राप्त झाल्या. आता या तक्रारींचे निराकरण करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनावर आहे. पाच जुलैपर्यंत हरकतींची प्रत्यक्ष छाननी, स्थळपाणी व पंचनामा करून अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

NMC
नाशिक : निधीखर्चाचे राजकारण विकासाच्या मुळावर

विभाग निहाय प्राप्त हरकती

पूर्व - २३७

पश्चिम- ४५

पंचवटी- ३९४

नाशिकरोड- २३१

सिडको- १३१२

सातपूर- ५०६

------------

एकूण २७२५

NMC
युकेस्थित हॉटेल ब्रॅंन्‍ड स्‍विस ट्रॅफलार नाशिकमध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.