येवला (जि. नाशिक) : लेट खरीप हंगामातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने प्रतिक्विटला ३५० रुपये अनुदान जाहीर केले. मात्र त्यासाठी सातबारा उताऱ्यावर कांदा नोंदीची सक्ती असल्याने ६० ते ७० टक्के या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी अशी नोंदणीच केलेली नसल्याने कांदे विक्री करूनही अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही अट शिथिल करण्याची मागणी होत आहे. (Obstacle of registration on seven days grant Fear of deprivation of more than half of onion producing farmers nashik news)
जिल्ह्यात खरिपात पोळ, लेट खरिपात रांगडा व रब्बीत उन्हाळ कांद्याचे पीक घेतले जाते. महसूल विभागाने जनजागृती केल्याने व मका विक्रीसह इतर पिकांच्या अनुषंगाने शेतकरी खरिपातील पिकांची ऑनलाइन पीकपेरा नोंदणी केली आहे.
त्यातच ऑनलाइन प्रक्रिया किचकट असल्याने अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे लेट खरिपातील लागवड झालेल्या कांद्याचा पीकपेरा शेतकऱ्यांनी नोंदवला नसून हाच निष्काळजीपणा अनुदानाच्या मुळावर उठण्याची भीती निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)
पावती धरावी गृहीत
अनेक शेतकऱ्यांनी पीकअप, ट्रॅक्टर चालकाच्या नावाने कांदे विक्री केले आहेत, तेही लाभापासून वंचित राहण्याची भीती आहे. ज्यांच्या सातबाऱ्यावर कांद्याची नोंदच नाही पण शेतकऱ्यांनी कांदा विक्री केल्याची व्यापारी व बाजार समितीकडे नोंद असून पावत्या आहेत.
त्यामुळे याच पावत्या अधिकृत धरून अनुदानाची मदत दिली जावी, सातबाराच्या नोंदीची सक्ती करू नये अशी मागणी शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांना २० एप्रिलपर्यंत विक्री पावतीसह सर्व कागदपत्रे बाजार समितीत जमा करण्याचे आवाहन बाजार समितीकडून होत आहे.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
जिल्ह्यात विक्रमी लागवड
देशात कांदा पिकविणाऱ्या राज्यांमध्ये क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत राज्य अग्रस्थानी असून राज्यात अंदाजे एक लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात कांदा पिकविण्यात प्रसिद्ध असून एकूण उत्पादनापैकी ३७ टक्के राज्यात तर देशातील १० टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतले जाते.
जिल्ह्यातील मालेगाव १५ हजार ०८३ हेक्टर, येवला १० हजार ६६४ हेक्टर, चांदवड १० हजार ५८७ हेक्टर, नांदगाव ७ हजार ४०८ हेक्टर, देवळा ३ हजार २८३ हेक्टर, सटाणा २ हजार ६२९ हेक्टर, सिन्नर ७३९.४० हेक्टर, कळवण ६६० हेक्टर व निफाड २६८ हेक्टर क्षेत्रावर तालुकानिहाय अंतिम लेट खरीप कांदा लागवड करण्यात आली होती.या क्षेत्रात लेट खरिपाचे पीक चांगले आले मात्र बाजारभावाने खेळ केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.