October Heat : परतीच्या पावसाने राज्यातून काढता पाय घेत असतानाच, आठवड्यांपासून ऑक्टोबर हीटचा नाशिककरांना चांगलाच तडाखा बसत आहे. सातत्याने नाशिकचा कमाल पारा ३२ अंश सेल्सिअसवर आहे.
कडक उन्हामुळे नाशिककरांना एप्रिल-मे मधील उन्हाची जाणीव होऊ लागली आहे. त्यातच रात्रीचा उकाडाही वाढला आहे.
दरम्यान, ऑक्टोबर हीटपासून बचाव करण्यासाठी भरपूर प्रमाण पाणी प्यावे व कडक उन्हात जाणे टाळणे आवश्यक आहे. अन्यथा ताप-थंडी सारख्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. (October heat hits Nashikkars Advice to avoid sun exposure along with drinking plenty of water)
ऑक्टोबर हीटचा तडाखा नाशिककरांना सहन करावा लागतो आहे. यंदा नाशिक शहर-जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. परतीच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. गोदावरी नदी यंदा म्हणावी तशी दुथडी भरभरून वाहिली देखील नाही.
मात्र गेल्या आठवड्यापासून नाशिकचा कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३२ अंश सेल्सिअस राहतो आहे. उन्हाळ्यात पडणाऱ्या उन्हाची जाणीव ऑक्टोबरमध्येच नाशिककर घेत आहेत. ऑक्टोबर महिन्यात सर्वात कमालीची नोंद झाली आहे.
ऑक्टोबर महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक असते. परंतु या उन्हाच्या तीव्रतेमुळे नाशिककर हैराण झाले आहेत. त्यातच रात्रीचा उकाडाही वाढला आहे. त्यामुळे थंडीच्या आगमनाची आतुरतेने नाशिकवासिय वाट पाहत आहेत.
अशी घ्यावी काळजी
- शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता असल्याने पुरेसे पाणी प्यावे
- वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकल्याची शक्यता.
- फ्रिजमधील थंड पाणी पिणे टाळावे
- बाहेरील थंड शीतपेय, पदार्थ खाणे टाळावे
- मलेरिया, डेंगीची साथ सुरू असल्याने दूषित पाणी, डासांपासून सावधगिरी बाळगावी
- उष्णतेपासून डोळ्याची काळजी घ्यावी
"ऑक्टोबर हीटसदृश्य परिस्थिती आहे. वातावरणातील या बदलाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने भरपूर पाणी प्यावे. आरोग्याची काळजी घ्यावी."- डॉ. प्रतीक भांगरे, एम.डी. जिल्हा रुग्णालय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.