Nashik Crime: ‘स्‍ट्रीट क्राइम’ कमी करण्यासाठी पोलिस कठोर; भररस्‍त्‍यात वाहन उभे करणाऱ्यांविरुद्ध गुन्‍हे

offence against vehicle parking on streets by police nashik news
offence against vehicle parking on streets by police nashik newsesakal
Updated on

Nashik Crime : रस्‍त्‍यावर वाहतुकीला अडथळा ठरतील, अशाप्रकारे वाहने उभी करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्‍यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो आहे. याअंतर्गत व्‍यावसायिकांवर थेट गुन्‍हे दाखल केले जात आहेत. (offence against vehicle parking on streets by police nashik news)

याशिवाय स्‍ट्रीट क्राइमला चाप बसवीत टवाळखोर, गुन्‍हेगार, बेशिस्‍त नागरिकांवर कारवाईला सुरवात केली आहे. सोमवारी (ता. ४) नाशिक रोड, उपनगर, अंबड, इंदिरानगर पोलिस ठाण्यांमध्ये रिक्षाचालक, हातगाडी चालकांविरुद्ध एकूण १८ गुन्हे दाखल केले आहेत.

शहर परिसरात वाहतूक कोंडीची समस्‍या तीव्र होते आहे. अशात वाहनतळाची समस्‍यादेखील प्रकर्षाने जाणवते आहे. भररस्‍त्‍याने वाहने उभी केली जात असल्‍याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अधिक गंभीर होतो. यामध्ये रिक्षाचालक, वाहनचालक आणि विक्रेतेदेखील कारणीभूत ठरतात.

offence against vehicle parking on streets by police nashik news
Nashik Crime: शिवपुराण कथेत दागिने चोरणाऱ्या दोघी गजाआड; मराठवाडा, राजस्थानातील टोळ्यांचे कृत्य

अशा बेशिस्‍त चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार सोमवारी पोलिसांनी १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये फळविक्रेते ७ जण, खाद्यपदार्थ विक्रेते चौघे असून, बेशिस्तीने रिक्षा उभी केलेले सहा आणि एका दुचाकीस्‍वाराचा समावेश आहे.

सगळीकडे करा कारवाई..

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध थेट अदखलपात्र गुन्‍हे दाखल केले जाता आहेत. दुसरीकडे यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्‍यामुळे शहरातील सर्वच भागांमध्ये अशा प्रकारे कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे. विशेषतः वर्दळीच्‍या ठिकाणी कारवाईची मागणी होते आहे.

offence against vehicle parking on streets by police nashik news
Nashik Crime: सव्वादोन लाख रुपये लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.