लर्निंग लायसन्स प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास कारवाई

learning licence
learning licenceesakal
Updated on

म्हसरूळ (जि.नाशिक) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (coronavirus) प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) नागरिकांच्या सोयीसाठी नुकत्याच सुरू झालेल्या ऑनलाइन शिकाऊ परवाना प्रक्रियेत अर्जदाराला घरबसल्या ऑनलाइन चाचणी परीक्षा देऊन शिकाऊ परवाना मिळू लागला आहे. अवघ्या तीनच दिवसांत या कार्यप्रणालीचा सुमारे ५६५ अर्जदारांनी लाभ घेतला. पण या प्रक्रियेत जर गैरप्रकार आढळला तर मात्र कारवाई करण्यात येणार आहे.(Offenses-irregularities -found-in-learner-license-process-nashik-marathi-news)

.....नाहीतर कायमस्वरूपी अपात्र ठरेल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (coronavirus) प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) नागरिकांच्या सोयीसाठी नुकत्याच सुरू झालेल्या ऑनलाइन शिकाऊ परवाना प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असा इशारा नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिला. अर्जदारांना यापूर्वी शिकाऊ परवान्यासाठी चाचणी परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून द्यावी लागत होती. मात्र, १४ जूनपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन विभागाने ही चाचणी परीक्षा आणि शिकाऊ परवाना प्राप्त करण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. यामुळे अर्जदाराला घरबसल्या ऑनलाइन चाचणी परीक्षा देऊन शिकाऊ परवाना मिळू लागला आहे. अवघ्या तीनच दिवसांत या कार्यप्रणालीचा सुमारे ५६५ अर्जदारांनी लाभ घेतला. यांपैकी ४४६ अर्जदारांनी घरबसल्या शिकाऊ परवाना मिळविला. यात ११९ अर्जदार अनुत्तीर्ण झाले आहेत. या कार्यप्रणालीचा गैरवापर करून काही ठिकाणी ही चाचणी उमेदवाराऐवजी अन्य व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी परिवहन कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन सुविधांचा गैरवापर करणाऱ्या अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्ती, महा-ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी दोषी ठरलेला अर्जदार मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १९ (इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरेल, अशी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कळसकर यांनी दिला.

चाचणीमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण ८७ टक्के

कार्यालयात शिकाऊ परवान्यासाठी चाचणी देणाऱ्या अर्जदारांची मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार चाचणीत उत्तीर्णतेचे प्रमाण ८७ टक्के आणि अनुत्तीर्णतेचे प्रमाण फक्त १३ टक्के होते. कोणाचीही मदत न घेता उत्तीर्ण होणाऱ्या अर्जदारांचे प्रमाणे मोठे आहे. त्यामुळे अर्जदारांनी या परीक्षेला न घाबरता कोणाचीही मदत न घेता चाचणी देणे आवश्यक आहे. अनुत्तीर्ण अर्जदारांना उत्तीर्ण होईपर्यंत कितीही वेळा चाचणी परीक्षा देण्याची सोय प्रणालीवर आहे.

आपली सुरक्षा आपल्या हाती

नागरिकांना वाहतूक नियम आणि चिन्हांची माहिती व्हावी, यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर प्रश्नावली उत्तरांसह उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ‘आपली सुरक्षा आपल्या हाती’ ही बाब लक्षात घेऊन शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने या प्रश्नावलीचा सराव केल्यास अर्जदार कोणाच्याही मदतीशिवाय सहज उत्तीर्ण होईल व जबाबदार वाहनचालक निश्चितच होईल.

learning licence
नाशिककर ‘सडन डेथ’ने चिंतित; मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक

प्रणालीचा गैरवापर करू नका

शिकाऊ परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार विहित केलेली चाचणी परीक्षा देणे अनिवार्य आहे. चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या अर्जदारासच शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्यात येते. पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीवेळी अशा अर्जदारांना वाहतूक नियम व चिन्हांबाबत माहिती आहे अथवा नाही याबाबत मौखिक चाचणी घेण्यात येणार असून, यात पात्र अर्जदारांचीच पक्क्या अनुज्ञप्तीसाठी चाचणी होणार आहे. परिवहन विभागाच्या ऑनलाइन प्रणालीचा गैरवापर करून कोणी शिकाऊ परवाना प्राप्त करीत असल्याची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्याबाबत माहिती वा तक्रार परिवहन कार्यालयाकडे करावी. -भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक-धुळे

learning licence
आशादायक! गुन्हेगारी सोडू इच्छिणाऱ्यांना पोलिसांकडुन संधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()