नाशिक : वेतन हवे असेल तर पाणी, घरपट्टी भरा...

मार्चअखेर निमित्ताने महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडून त्याच्या काही दिवसात वसुली मोहीम सुरू होईल...
water bill
water bill sakal
Updated on

जुने नाशिक : अधिकारी- कर्मचाऱ्यांना जानेवारीचे वेतन हवे असेल तर त्यांना प्रथम घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकी भरावी लागेल. अन्यथा वेतन मिळणार नाही. असा फतवा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी काढला आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या आदेशाने धडकी भरली आहे. नागरिकांकडून मात्र त्यांच्या आदेशाचे समर्थन करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीत भर पडण्यास मदत होणार असल्याचेही बोलले जात आहे.

water bill
दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाइनच; राज्य मंडळ ठाम

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी गेल्या महिन्यात सोमवारी (ता. २४) कार्यालयप्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. करवसुली संदर्भात आढावा घेतला असता, अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे घर आणि पाणीपट्टी मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याचे आढळले. नागरिकांना थकबाकी भरण्यास सांगणाऱ्याकडेच इतक्या मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याचे आयुक्तांसमोर आले. त्याचा परिणाम कुठेतरी विकासकामांवर होत असल्याची जाणीव झाली. त्यांच्याकडून सर्व कार्यालय याबाबत पत्र पाठवून आदेश देण्यात आले.

water bill
औरंगाबाद महापालिकेकडे थकला ७५ कोटींचा कर जिल्हाधिकाऱ्यांचं प्रशासकांना पत्र

अधिकारी- कर्मचाऱ्यांना जानेवारीचे वेतन आले असेल तर त्यांनी प्रथम घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकी भरावी. थकबाकी भरलेले प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावी. त्यानंतरच त्यांचे वेतन करण्यात यावे. त्यामुळे थकबाकीदार अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनेकांनी धावपळ करत थकबाकी भरण्याकडे कल केला आहे. यामुळे महापालिका तिजोरीत मोठी भर पडणार आहे. शिवाय स्वतः थकबाकी भरत नाही आणि आम्हास थकबाकी भरण्यासाठी तगादा लावतात. थकबाकी भरली नाही तर कारवाई सांगण्यात येते. त्यांनी प्रथम थकबाकी भरली असे म्हणणाऱ्या काही नागरिकांना चाप बसण्यास मदत होईल. अधिकारी-कर्मचारी यांच्या स्वतःच्या नावावर घर किंवा नळ कनेक्शन नोंदणी नसेल तर कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर आहे. त्यांना भरण्यास सांगावे. सामाईक अर्थात सोसायटी, अपार्टमेंटमध्ये राहत असेल तर त्यांचे अध्यक्ष, सचिव यांना संबंधित अपार्टमेंट, सोसायटीची थकबाकी भरण्यास सांगावे. अन्यथा महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा खंडित करण्यात येतील याबाबत जनजागृती करावी. अशा प्रकारचा उल्लेखदेखील आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रात करण्यात आला आहे.

water bill
राहुल गांधींचं 'ते' वक्तव्य असमर्थनीय; अमेरिकेने सुनावलं

विभागीय कार्यालयाची वसुली वाढणार

मार्चअखेर निमित्ताने महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडून त्याच्या काही दिवसात वसुली मोहीम सुरू होईल. सामान्य थकबाकीदारांकडून वसुली तर होतच असते. यंदा महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांची थकबाकी देखील मोठ्या प्रमाणावर भरले जाणार असल्याने मार्च अखेर वसुली वाढण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.