Police Sports Competition : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे औपचारिक उद्‌घाटन

स्पर्धेचे औपचारिक उद्‌घाटन गुरुवारी (ता. ८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व राज्य पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत होणार आहे.
State Police Sports Competition
State Police Sports Competitionesakal
Updated on

Police Sports Competition : राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना गेल्या रविवारी (ता. ४) प्रारंभ झाला असला, तरी या स्पर्धेचे औपचारिक उद्‌घाटन गुरुवारी (ता. ८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व राज्य पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पस्तिसाव्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा त्र्यंबकेश्‍वर रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीतील १९ मैदानांवर सुरू आहेत. (Official opening of police sports competition today by eknath shinde nashik news)

या स्पर्धेचे यजमानपद नाशिक शहर पोलिस आयुक्तालय भूषवत असून, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे नियोजन केले. स्पर्धेचे औपचारिक उद्‌घाटन गुरुवारी दुपारी चारला होणार आहे. स्पर्धेचा समारोप शनिवारी (ता. १०) दुपारी साडेचारला होईल.

या वेळी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेते संघ व खेळाडूंना पदक प्रदान केले जाणार आहे. या स्पर्धांसाठी राज्यभरातून साडेतीन हजार पोलिस खेळाडू सहभागी झाले. तसेच, राज्यातील अप्पर पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

State Police Sports Competition
Police Sports Competitions: पुणे-चिंचवड, अमरावती, नागपूरची विजय सलामी! 34 व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांना थाटात प्रारंभ

खेळाडूंची सर्वोत्तम निगा

राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांसाठी नाशिकमध्ये आलेल्या राज्यभरातील पोलिस खेळाडू व अधिकाऱ्यांसाठी शहर पोलिस आयुक्तालयातर्फे सर्वोत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पुरुष खेळाडूंसाठी पंचवटीतील म्हाडाच्या इमारतीत, तर महिला खेळाडूंची महाराष्ट्र पोलिस अकादमीत निवासाची सोय करण्यात आली.

थंडीचे दिवस असल्याने गरम पाण्याने अंघोळीचीही सोय केली आहे. तसेच, भोजनाचीही उत्तम सोय करण्यात आली. अकादमीत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले आहे. सोयी-सुविधांची पोलिस आयुक्त संदीप कर्णिक स्वत: पाहणी करून खेळाडूंना कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेत आहेत.

State Police Sports Competition
Police Sports Competition: वेटलिफ्टिंगमध्ये पारस देशमुख, माधवी साळुंकेंना सुवर्ण! पुणे, ठाणे, अमरावती परिक्षेत्र संघांची आगेकूच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.