Nashik News: मुख्यालयासह पंचायत समितीस्तरावर अधिकारी; शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी फिल्डवर

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
ZP CEO Ashima Mittal, Nashik Newsesakal
Updated on

Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १४ जुलैला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून सर्व विभागांमधील योजनांचा लाभ नागरिकांना झाला

. त्या लाभार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी विशेष मोहीम सोमवार (ता. १०)पासून सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत मुख्यालयातील सर्व विभागप्रमुख, तसेच पंचायत समिती, ग्रामपंचायतस्तरावरील अधिकारी थेट फिल्डवर उतरले आहेत.

मंगळवारी (ता. ११) ही मोहीम सुरू असणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. (Officials at Panchayat Samiti level including HQ field to provide benefits of government schemes Nashik News)

जिल्हा परिषदेमधील सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी दोन दिवस ही विशेष मोहीम राबविली जात आहे. यात सोमवारी योजना व लाभार्थ्यांची माहिती गोळा केली जाईल. मंगळवारी प्रत्यक्ष नेमणूक केलेले संपर्क अधिकारी सर्व तालुक्यांना व ग्रामपंचायतींना भेटी देतील.

यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे (नाशिक), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे (त्र्यंबकेश्वर), सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत पवार (इगतपुरी), शिक्षणाधिकारी भगवान फुलारी (पेठ), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्शल नेहते (सुरगाणा),

कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे (दिंडोरी), कार्यकारी अभियंता पंकज मेतकर (कळवण), जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील (बागलाण), जिल्हा मोहीम अधिकारी कृषी (देवळा), माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील (चांदवड), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे (मालेगाव),

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
Ramdas Athawale: आरपीआय- पॅंथर एकत्र काम करतील : रामदास आठवले यांना विश्वास

कृषी अधिकारी मयूरी झोरे (नांदगाव), माध्यमिक शिक्षण अधीक्षक सुधीर पगार (येवला), कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे (निफाड), उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी (सिन्नर) यांचा समावेश आहे.

सदर अधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतस्तरावर देय असणाऱ्या सर्व वैयक्तिक लाभाच्या विकास योजना यांची माहिती घेणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांचे लाभ मिळण्याबाबतचे निवेदन भरून घेणे, लाभार्थ्यांशी संवाद साधून त्याचा फोटो काढणे, तसेच या सर्व प्रक्रियेचा व्हिडिओ काढावा, अशा सूचना श्रीमती मित्तल यांनी दिल्यात.

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
NMC News: रिंगरोड साठी अडीच पट TDR?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.