Nashik : पत्राने फोडली गजाआडच्या भिंतींना वाचा!वृद्ध कैद्याकडे ‘फिटफॉर’ प्रमाणपत्रासाठी लाच मागणारे अधिकारी अटकेत

खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली. मात्र, सुटकेसाठी वयोमान अन् चांगल्या वर्तणुकीमुळे ‘फिटफॉर’ प्रमाणपत्राअभावी चार वर्षांपासून कारागृहात खितपत पडलेला बंदिवान नियतीच्या फेऱ्याने उद्‍ध्वस्त झाला अन् त्यात पोखरलेली व्यवस्थाही न्याय करीत नव्हती.
Nashik
Nashik sakal
Updated on

नाशिक : खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली. मात्र, सुटकेसाठी वयोमान अन् चांगल्या वर्तणुकीमुळे ‘फिटफॉर’ प्रमाणपत्राअभावी चार वर्षांपासून कारागृहात खितपत पडलेला बंदिवान नियतीच्या फेऱ्याने उद्‍ध्वस्त झाला अन् त्यात पोखरलेली व्यवस्थाही न्याय करीत नव्हती. मात्र, मित्राला लिहिलेल्या पत्राने वाचा फोडली अन् तो धावून आला. त्याच्या तक्रारीनंतर या प्रमाणपत्रासाठी नाशिक रोड कारागृहातील लाच मागणारे दोन वैद्यकीय अधिकारी ‘लाचलुचपत’च्या सापळ्यात अडकले. एखाद्या चित्रपटाला शोभावी, अशीच ही घटना.

नाशिक रोड कारागृहात एका खुनाच्या गुन्ह्यात एक कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. वयोमान झालेले असताना केवळ त्या बंदीला फिटफॉर प्रमाणपत्रासंदर्भातील कोणतीही माहिती नसल्याने ते कारागृहात खितपत पडले होते. काही वर्षांपूर्वी कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी आलेल्या एकाने वृद्ध बंदीला फिटफॉर प्रमाणपत्राबद्दल सांगितले होते.

त्यानुसार, वृद्ध बंदीने फिटफॉर प्रमाणपत्रासाठी नाशिक रोड कारागृहात असलेल्या वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे प्रयत्न केले. सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, काही महिन्यांनी त्यांनी त्या वृद्ध बंदीला प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शविली. परंतु, त्यासाठी त्यांनी पैशांची मागणी केली. मात्र, घरी कमावते कोणी नाही, जे आहे ते कोणत्या परिस्थितीत जीवन कंठत असतील, याचाच घोर बंदीला असताना फिटफॉर प्रमाणपत्रासाठी भ्रष्ट वैद्यकीय अधिकाऱ्याला पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न पडला.

कारागृहातील अधिकाऱ्यांविरुद्ध जेव्हा तक्रार आली, तेव्हापासूनच सापळा यशस्वी झाला पाहिजे, यासाठी पथकाने प्रयत्न केले. त्यात यश आले. कोणत्याही कारणासाठी लाच घेणे हा गुन्हाच आहे.

- शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

काय आहे फिटफॉर प्रमाणपत्र?

कारागृहातील बंदिवानांच्या सुटकेसंदर्भातील समितीत कारागृहाच्या विशेष महानिरीक्षकांसह न्यायाधीश, कारागृहाचे अधीक्षक असतात. समितीला कारागृह रुग्णालयाकडून बंदिवानाचे ‘फिटफॉर’ प्रमाणपत्र दिले जाते. चौकशीनंतर बंदीच्या सुटकेचा निर्णय होतो. बंदीचे वर्तन योग्य असावे, त्याचे वय ६५ पेक्षा अधिक असावे अथवा १४ वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा भोगलेली असावी, असे निकष आहेत.

...अन् पत्र आले

कारागृहात असताना मित्र वृद्ध बंदीच्या संपर्कात होता. बंदीलाच नव्हे, तर त्याच्या घरीही मिळेल तशी मदत तो करीत होता. त्यामुळे बंदिने त्या मित्राकडे पत्राद्वारे आर्थिक मदतीची याचना केली आणि ती कशासाठी, तेही तपशीलवार पत्रात लिहिले होते. यातूनच सारा उलगडा झाला अन त्या मित्राने पुढील पाठपुरावा केला. त्या मित्राने वृद्ध बंदीला मदत करण्याची तयारी दर्शविली. परंतु, याच बंदीसारखे शेकडो बंदी हे फिटफॉर प्रमाणपत्राअभावी कारागृहात खितपत पडले असतील, त्यांचे काय? अशा भ्रष्ट व्यवस्थेला चव्हाट्यावर आणण्यासाठीच त्या मित्राने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून विभागाने सापळा रचला. लाचखोर वैद्यकीय अधिकाऱ्यांना सापळ्यात अडकविण्यासाठी कारागृहात सापळा रचणे जिकिरीचे होते. दोन लाचखोर अधिकारी जेवणासाठी बाहेर येणार होते, तेव्हाच लाचेची रक्कम स्वीकारणारही होते. हीच संधी साधून ‘लाचलुचपत’च्या पथकाने सापळा रचला आणि लाचखोर अडकले.

काय आहे फिटफॉर प्रमाणपत्र?

कारागृहातील बंदिवानांच्या सुटकेसंदर्भातील समितीत कारागृहाच्या विशेष महानिरीक्षकांसह न्यायाधीश, कारागृहाचे अधीक्षक असतात. समितीला कारागृह रुग्णालयाकडून बंदिवानाचे ‘फिटफॉर’ प्रमाणपत्र दिले जाते. चौकशीनंतर बंदीच्या सुटकेचा निर्णय होतो. बंदीचे वर्तन योग्य असावे, त्याचे वय ६५ पेक्षा अधिक असावे अथवा १४ वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा भोगलेली असावी, असे निकष आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com