प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात निरुपयोगी वाहने धुळखात पडुन

Unused Ambulance in dust
Unused Ambulance in dustesakal
Updated on

अंबासन (जि.नाशिक) : ग्रामीण भागातील (Rural Area) अत्यवस्थ रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती (Accident), गर्भवती महिला तसेच वयोवृध्दांना आपत्कालीन (Emergency) स्थितीत तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभागाकडून खेड्यापाड्यांपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून रुग्णवाहिका (Ambulance) उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र यातील अनेक निर्लेखित जुनाट रुग्णवाहिका देखभाल, दुरूस्ती अभावी गेल्या अनेक वर्षांपासून धुळखात पडल्या आहेत. रूग्णांना वेळप्रसंगी पदरमोड करून खाजगी रूग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागत आहे. (Old ambulance In dust in premises of primary health center Nashik News)

तालुक्यातील आरोग्य विभागाला अनेक समस्यांनी ग्रासले असून रूग्णांना रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नाहीत असे असतानाच बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात निरुपयोगी रुग्णवाहिका जंग खात पडून आहेत. सदर वाहनांमुळे पावसाळ्यात विषारी जीवजंतूना वास्तव्यास मोकळीक मिळत असल्याने रूग्णांसाठी नाहक धोकादायक ठरू शकते. संबंधित विभागाला विनावापर, निरुपयोगी वाहनांची विल्हेवाट लावण्यास मुहुर्त कधी मिळेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यात रूग्णांना सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाचे अकरा प्राथमिक केंद्र, बावन्न उपकेंद्र तर तीन ग्रामीण रुग्णालये आहेत. दरम्यान बहुतांश जुन्या जीर्ण निरुपयोगी रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात काटेरी झाडाझुडपांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहेत.

विनावापर रुग्णवाहिकांची काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या पथकाने पडताळणी केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित विभागाने आरोग्य केंद्रातील रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी वाहनांची नियतकालिक देखभाल व दुरुस्ती वेळच्या वेळी करून सुस्थितीत ठेवून आरोग्य सेवेसाठी पूर्ण क्षमतेने वाहने वापरात येतील या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. धुळखात पडून असलेल्या निरुपयोगी, विनावापर आणि निर्लेखित वाहने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातून हलवावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Unused Ambulance in dust
Nashik : दुकान फोडणारा संशयित जेरबंद

निर्लिखित वाहने.

१)ताहराबाद = १२

२) अंबासन = १

३) ब्राम्हणगाव = १

Unused Ambulance in dust
नाशिक : वाळूचा 72 लाखांचा साठा जप्त

"प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून नादुरुस्त वहाने ऊभी आहेत, या वहानात अनेक विषारी जीवजंतू साप, विंचु पावसाळ्यात आसरा घेऊन राहू शकतात यामुळे तेथील रूग्णांना उपचार घेण्यासाठी येणा-या माता-भगिनींना धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने त्वरित आरोग्य केंद्रातील सर्व भंगार बंद पडलेली वहाने तेथुन हलवावीत व तो परिसर स्वच्छ करावा."

- गजानन साळवे, सामाजिक कार्यकर्ते. ताहाराबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.