Nashik ZP News : प्रत्येक विभागातून येणारी फाईल परिपूर्ण तसेच योग्य टिप्पणी नसल्याने फायलींचा प्रवास लांबला जातो. मात्र, फाईल काढण्यासाठी लागणारा हा कालावधी कमी करण्यासाठी व फायलींचा प्रवास सुलभ होण्यासाठी त्यावरील टिपण योग्य पद्धतीने लिहिलेले पाहिजे.
विभागातील कनिष्ठ असो की सहाय्यक प्रशासन अधिकारी असो. त्यांनी योग्य पद्धतीने हे तंत्र आत्मसात करावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने प्रशिक्षणार्थींना केले.
प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे मुख्यालयासह जिल्हाभरातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांचे दोनदिवसीय प्रशिक्षण झाले, त्याचा गुरुवारी (ता. १७) रावसाहेब थोरात सभागृहात प्रारंभ झाला. (On job training to assistant and junior officers by ZP administration nashik news)
पहिल्या सत्रात, कनिष्ठ लेखाधिकारी प्रियंका कुलकर्णी यांनी पेन्शन प्रकरणे या विषयावर मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने निवृत्त कर्मचाऱ्यांना वेळात पेन्शन मिळावे, यासाठी पूर्वतयारी गरजेची असल्याचे सांगत, निवृत्तीच्या दिवशी संबंधित कर्मचाऱ्यांस सर्व फायदे देणे सोपे होतील, असे सांगितले.
पेन्शन प्रकरणाच्या फायली कशा पद्धतीने काढायच्या, यात येणारे अडथळे, त्यांचे निवारण कुलकर्णी यांनी या वेळी केले. दुसऱ्या सत्रात कनिष्ठ प्रशासन अधिकारी भूषण भार्गवे यांनी ‘पंचायतराज सेवार्थ, अनुषंगिक कार्यवाही करणे, लेव्हल १- लेव्हल २- लेव्हल ३’ याबाबत सविस्तर विवेचन केले.
अखेरच्या टप्प्यात माध्यमिकचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिवराम बोटे यांनी ‘सर्व रजेचे प्रकार व रजा नियम, बालसंगोपन रजा, सेवाप्रवेश नियमाच्या अनुषंगिक सर्व कामकाज पद्धती’बाबत मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने बालसंगोपन रजा मंजूर करण्याबाबत कार्यवाहीसंदर्भात प्रत्येक तालुक्यातील पद्धत विचारली असता, सर्व तालुक्यांमधील कार्यवाहीत भिन्नता आढळत असल्याचे दिसून आले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी या सत्रात सहभाग घेत यावर विवेचन केले. प्रामुख्याने सर्व विभाग असो, की तालुके यातून एकाच प्रकारची कार्यवाही होणे अपेक्षित आहे. त्यासाठी असलेल्या शासन आदेशाचे वाचन करीत त्यातील पद्धती समजावून सांगत त्यांचाच अवलंब करण्याचे निर्देश परदेशी यांनी दिले.
प्रत्येक विभागातून फाईल योग्य पद्धतीने टिपण आल्यास, फाईल वेळात काढणे शक्य होईल. फायलींचा लांबलेला प्रवास कमी करण्यासाठी प्रत्येकाने नियोजन करण्याच्या सूचना परदेशी यांनी दिल्या. तीन कनिष्ठ प्रशासन अधिकारी वगळता सर्व कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रशिक्षणास उपस्थित होते.
प्रशिक्षणाचा आज समारोप
शुक्रवारी (ता. १८) दोनदिवसीय प्रशिक्षणाचा समारोप होणार आहे. पत्रलेखन, टिपणी लेखन, सर्वसाधारण आदेश काढताना घ्यावयाची दक्षता, अनुकंपा प्रस्ताव व वैद्यकीय देयके, विभागीय खाते चौकशी प्रस्ताव तयार करण्याची कार्यपद्धती, बिंदुनामावली, सेवाज्येष्ठता, पदोन्नती व न्यायालयीन प्रकरणे कार्यपद्धती यावर प्रशिक्षण होणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत समारोप होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.