Varuthini Ekadashi : प्रतिवर्षी चैत्र कृष्ण एकादशी म्हणजे वरुथिनी एकादशी निमित्ताने निवृत्ती नाथांच्या समाधीला चंदनाची उडीचे लेपन करण्यात येईल.
दुपारी दोन वाजेच्या सुमारास भाविकांनी चंदनाचे खोड सहाणेवर वाटुन बादल्या भरुन तयार केलेल्या उडीचे लेपन ग्रीष्म ऋतुचा त्रास देवास होउ नये व पर्यायाने भाविकांना होऊ नये अशी यात वारकरी भक्तांची भावना आहे. (On occasion of Varuthini Ekadashi Ooty Vari will celebrated at Trambakeshwar nashik news)
त्यामुळे सुमारे आठवडाभरात मोठ्या प्रमाणावर चंदनाचे खोडउगाळुन ही उटी तयार केली जाते. त्याच प्रथेप्रमाणे सध्या ही उटी महिला भाविक मोठ्या प्रमाणावर तयार करीत आहेत.
आज याच वारीसाठी मोठ्या प्रमाणावर पायी चालत दिंड्या शहरात दाखल होत आहेत. येथे दशमी ते द्वादशी असा कार्यक्रम संपन्न होतो.
यात प्रामुख्याने भाविकच या उटीची व वारीची व्यवस्था करतात. दशमी ला काही दिंड्या भाविकांना पंगत देतात तर दिवसभर धार्मिक कार्यक्रम सादर केले जातात. एकादशीला दिवसभर वारकरी भाविक येत रहातात.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
एक छोटी यात्रा संपन्न होते. दुपारी लेपन केलेली उटी रात्री उशिरा भाविकांना प्रसाद स्वरुपात वाटण्यात येते. या उटी च्या प्रसादासाठी भाविकांची झुंबड उडते. या कालावधीत पालखी सोहळा साजरा करण्यात येतो.
आज रविवारी ही उटीची वारी म्हणजे यात्रा संपन्न होत असुन द्वादशी रोजी उपवास तोडल्यावर भाविक माघारी निघतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.