Nashik News : जेल रोडच्या चिमुकल्या गार्गी शिंदेने एक आगळावेगळा विक्रम रचला आहे.
महालक्ष्मीनगरमधील भास्कर शिंदे यांची नात आणि नीलेश शिंदे, कांचन शिंदे यांची मुलगी गार्गी शिंदे हिची अनेक वस्तू बिनचूक ओळखण्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. (One and a half year old Gargi create unique record nashik news)
माजी नगरसेवक शैलेश ढगे यांनी गार्गीचा सत्कार केला. एक वर्ष ६ महिने वय असलेली गार्गी विविध वस्तू ओळखते.
४० देशांचे ध्वज, १६ प्रकारच्या गाड्या, २१ प्रकारच्या भाज्या, २५ प्रकारचे फळे, २८ प्रकारचे प्राणी, ६ प्रकारची फुले, ८ देवता, ८ प्रकारच्या किचन वस्तू, ३३ वेगवेगळ्या वस्तू ती ओळखते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नाशिक शहरामध्ये या वयात रेकॉर्ड करणारी ती पहिली लहान मुलगी आहे. दोन महिन्याची असताना आईने तीला पुस्तके दाखविण्यास सुरवात केली. आजोबांनी पहिल्या वाढदिवसाला गेम दिला. त्यामुळे गार्गीची स्मरणशक्ती तल्लख झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.