Nashik News: वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचा बुधवारी एकदिवसीय संप

Strike
Strikeesakal
Updated on

सातपूर : वैद्यकीय प्रतिनिधीच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. २०) एकदिवसीय देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे राज्यातील २५ हजार सदस्य यात सहभागी होत आहेत.

संघटनेचे नाशिक युनिट सचिव अमोल पाटील यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. देशातील जवळपास दोन लाख वैद्यकीय प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारकडे आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी संपात सहभागी होणार आहेत. (One day strike by Medical Representative Association on Wednesday Nashik News)

वैद्यकीय प्रतिनिधींसाठी असलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस टाळाटाळ केली जात असून, वैद्यकीय प्रतिनिधींसाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय त्रिपक्षीय समितीची बैठक केंद्रीय कामगारमंत्र्यांनी एकदाही बोलावली नाही.

त्यामुळे औषधी कंपनीमालकांची अरेरावी वाढली असून, वैद्यकीय प्रतिनिधींना बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकणे, पगार थांबवून मानसिक त्रास देणे, सेल्ससाठी प्रेशर करणे आदी प्रकारे त्रास दिला जात आहे.

Strike
MPSC Exam: ‘गट क’ मुख्य परीक्षेला 376 परीक्षार्थ्यांची दांडी! शहरातील 20 केंद्रांवर 7 हजार 154 परीक्षार्थ्यांची हजेरी

जीपीएससारख्या प्रणालीमुळे कामगारांच्या प्रायव्हसीवर अतिक्रमण समस्यामध्ये वाढ झाली आहे.

औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घालावी, औषधाच्या व वैद्यकीय उपकरणांच्या किमती अबकारी कर उत्पादनावर असाव्यात, केंद्राने औषधांवर जीएसटी लावू नये आदी मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे.

२० डिसेंबरला एमएसएमआर नाशिक युनिट ऑफिस, गोळे कॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालय वैद्यकीय प्रतिनिधी रॅली काढत मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देणार आहेत.

Strike
Mahanubhav Sammelan: महानुभाव पंथाचे 20 पासून गुजरातेत संमेलन! श्रीमद् ‌भगवद्‌गीता जयंती महोत्सव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.