Nashik Accident News : मुंबई नाशिक महामार्गावर शुक्रवार ( ता.७ रोजी ) पहाटे ६.३० वाजेच्या नादुस्त अवस्थेत असलेल्या ट्रकला पाठीमागुन खासगी लक्सरी बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यु झाला तर बसमधील चालकासह ११ प्रवाशी गंभीर जखमी झाले.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक सुमारे चार तास ठप्प झाली होती. (One dies in private bus accident near Igatpuri 12 passengers injured Nashik News)
महामार्गाच्या बोरटेंभे शिवार येथील पोद्दार शाळेसमोर नादुस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा असतांना खबरदारी म्हणून ट्रकच्या आजूबाजूला सेफ्टी कोण लावण्यात आले होते.
मात्र पाठीमागून नाशिक दिशेने येणाऱ्या खाजगी ज्वेल फिश ट्रॅव्हल्सची बस प्रवाशांना शिर्डी दर्शनाला घेऊन जाणारी खासगी लक्सरी बसने बंद असलेला ट्रक क्रमांक ( एम.एच.o४ एफ.जे ३८०३ ) यास पाठीमागून नाशिक दिशेने जाणाऱ्या बस प्रवाशांना शिर्डी दर्शनाला घेऊन जाणारी खासगी लक्सरी बस क्रमांक ( एम.एच.४८ के.३७१८ ) चालकाला पुढे असणाऱ्या उभ्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्याने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
यात ट्रक मागे काम करणरा ट्रक चालक मेहमूद सुभेदार शेख वय ६० वर्ष हा जागीच ठार झाला तर बसचालक महेंद्र पाल हा गंभीर जखमी झाला असून शिर्डी दर्शनासाठी जाणारे बस मधील इतर ११ प्रवासीही जखमी झाले आहे.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलीस पथक व टोल प्लाझाचे कर्मचारींनी घटनास्थळी मदत कार्य करून जखमींना घोटी टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
घटनेतील जखमी पैकी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेले जखमीची नावे तपोव गुप्ता, एतेवर देव गुप्ता, शरद कुमार गुप्ता, थॉमस त्रिभुवन, सर्व रा मुंबई. तर अनेक जखमी प्रवाशांना खाजगी रूग्णालयात उपचाराकरीता दाखल केल्यामुळे त्यांची नावे समजू शकली नाही.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक सुमारे चार तास ठप्प झाल्यामुळे महामार्ग सुरक्षा पोलीसांनी इगतपुरी शहरातुन वाहतुक वळवुन काही तासांत महामार्ग वाहतुक सुरळीत केली.मात्र अचानक शहरातुन अवजड वाहन व लहान मोठे वाहन गेल्याने शहरात काहीशी कोंडी दिसुन आली. या घटनेत महामार्ग सुरक्षा पोलीस व टोलप्लाझा कर्मचारी, शहर पोलीस आदिंनी परिश्रम घेतले .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.