Nashik Fraud Crime : मिळकत प्रकरणात सराफाची दीड कोटीची फसवणूक

fraud Crime News
fraud Crime Newsesakal
Updated on

नाशिक : संगनमताने घेतलेले पैसे परत करण्यासाठी संशयितांनी आदिवासी मिळकत खरेदी करून देण्याच्या बहाण्यानेही पैसे घेतले. परंतु खातरजमा केल्यानंतर संशयितांनीच नाशिकमधील सराफाची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी न्यायालयाने गंभीर दखल घेत फसवणुकीची नोंद करून घेत संशयितांना नोटिसा जारी केल्या. (One half crore fraud of jewellers in income case Nashik Fraud Crime)

नाशिक सराफ बाजारातील गुरव सराफाचे संचालक प्रशांत गुरव यांनी या फसवणूक प्रकरणी जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. मकरंद दास्ताने, सुजाता दास्ताने, शकुंतला दास्ताने, विष्णू गांगुर्डे, संदीप गांगुर्डे, अशी संशयितांची नावे आहेत.

संशयित दास्ताने कुटुंबीयांनी फिर्यादी गुरव यांच्याकडे घरभरणी, सोने खरेदीसाठी ४४ लाख रुपये घेतले होते.

ही रक्कम परत करण्याच्या बहाण्याने दास्ताने यांनी तळेगाव त्र्यंबकेश्‍वर येथील रामदास गांगुर्डे यांची आदिवासी मिळकत फिर्यादी गुरव यांना खरेदीखत करून घेतलेली रक्कम परत करण्याचे आश्‍वासन दिले. त्यासाठी दोन लाख ३४ हजार रुपयांच्या नजराण्याची रक्कमही गुरव यांच्याकडून स्वत:च्या बँक खात्यात घेतली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

fraud Crime News
Nashik Crime News: सिन्नर परिसरात धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; कथित फादरसह चौघांना अटक

दरम्यान, या प्रकरणी गुरव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळ कायदा शाखेकडे माहितीच्या अधिकारात अर्ज करून माहिती मागविली असता त्यात त्यांना धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणात शाखेकडे अर्जच आलेला नसल्याचे गुरव यांना समजले.

त्यामुळे संशयित दास्ताने यांनी संगनमताने आपली फसवणूक केल्याचे समोर आल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. त्यात न्यायालयाने सरकारवाडा पोलिसांना चौकशीचे आदेश दिले

. चौकशी अहवालात संशयित दास्ताने यांनी संगनमताने गुरव यांची एक कोटी ६१ लाख १८ हजारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, गुरव यांचे वकील ॲड. राहुल पाटील यांनी युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा नोंद केला. तसेच, संशयितांना नोटिसा बजावण्याचे आदेशही जारी केले.

fraud Crime News
Dhule Crime News : धारदार शस्त्राने भोसकून शिरपूरला तरुणाचा खून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.