ITI Admission : राज्यात ITIच्या दीड लाख जागा! यंदाच्या सत्रात प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने

ITI Admission
ITI Admission sakal media
Updated on

ITI Admission : शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल नुकताच ऑनलाइन पद्धतीने जाहीर झालेला असून राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत यंदाच्या सत्रातील प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने दिले जाणार आहे.

शासकीय आणि खासगी कोट्यातून सुमारे दीड लाख जागा विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाच हजार जागा वाढल्या आहेत. (One half lakh seats of ITI in state Admission to this year session through central online admission process nashik news)

राज्यात तांत्रिक शिक्षणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाची आतुरतेने वाट पाहत असतो. यंदा ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ५७४ अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून अनुक्रमे ९५ हजार ३८०, आणि ५९ हजार १२ अशा १ लाख ५४ हजार ३९२ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.

प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या ८३ असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.

राज्यातील एकूण जागांपैकी ५३ हजार ६०० जागा मुलींसाठी राखीव असून इतर प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी २० हजार ७२, अनुसूचित जमातीसाठी १० हजार ८०८, इतर मागास प्रवर्गासाठी २९ हजार ३३५, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक १५ हजार ४३९, विमुक्त जाती ४ हजार ६३१,

भटक्या जमाती (ब) (क) व (ड) यासाठी अनुक्रमे ३ हजार ८५९, ५ हजार ४०४, ३ हजार ८८ एवढ्या जागा उपलब्ध आहेत. तसेच अल्पसंख्याक उमेदवारांसाठी २ हजार ५४८, दिव्यांग उमेदवारांसाठी ७ हजार ७१९ व खुल्या गटातील उमेदवारांसाठी ६१ हजार ७५६ जागा उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ITI Admission
Foreign Education : उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल तर द्यावी लागेल ही परीक्षा

यंदा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (नाशिक) व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (पुणे) येथे एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या व्यवसायाच्या प्रत्येकी दोन तुकड्यांना डीजीटी (नवी दिल्ली) यांच्याकडून संलग्नता प्राप्त होणे अपेक्षित असून यातील प्रत्येकी एका तुकडीमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत.

याचबरोबर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला (मुलींची), धुळे, पुणे (मुलींची), सांगली, नाशिक, जालना, अमरावती, नागपूर, मुलुंड, अंबरनाथ, गडचिरोली, घनसावंगी अशा १२ संस्थांमधून ड्रोन टेक्निशियन या व्यवसायामध्ये नव्याने प्रवेशाला सुरवात होणार आहे.

या व्यवसायाच्या माध्यमातून भारत ड्रोन टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे.

प्रशिक्षणार्थींची गुणवत्ता वाढणार....

यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नव्याने २५७ तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांच्याकडून संलग्नता प्राप्त झालेली असून या व्यवसायांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. यामुळे राज्याच्या प्रवेश क्षमतेमध्ये ५ हजार १४० एवढ्या भरघोस जागांची वाढ झालेली आहे.

या वर्षभरात ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत नव्याने ३० तुकड्यांना मान्यता प्राप्त झालेली असून या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना थेट औद्योगिक आस्थापनांमध्ये जाऊन सुमारे सहा महिने एवढ्या कालावधीपर्यंतच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल.

ITI Admission
Facebook Money Fraud : रिक्वेस्ट स्वीकारताय.. सावधान! फेसबुकद्वारे होऊ शकते तुमची फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()