Nashik First News : राज्यातील दीड हजार वाहतूक पोलिसांना नाशिक फर्स्टच्या प्रशिक्षणाचा लाभ

राज्यातील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना नाशिकमधील डिटेक्टीव्ह ट्रेनिंग स्कुलमध्ये नियमित प्रशिक्षणासाठीचे वर्ग घेतले जातात.
One half thousand traffic police in state benefited from training of Nashik First Nashik News
One half thousand traffic police in state benefited from training of Nashik First Nashik Newsesakal
Updated on

नाशिक : राज्यातील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना नाशिकमधील डिटेक्टीव्ह ट्रेनिंग स्कुलमध्ये नियमित प्रशिक्षणासाठीचे वर्ग घेतले जातात.

पंधरा दिवसांच्या या प्रशिक्षणात एका दिवस वाहतूक पोलीसांना नाशिक फर्स्टच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा व जागरुकता याबाबत प्रशिक्षण दिले जाते आहे.

या माध्यमातून राज्यातील सुमारे दीड हजार वाहतूक पोलिसांना या प्रशिक्षणाचा लाभ झाला आहे. (One half thousand traffic police in state benefited from training of Nashik First Nashik News)

डिटेक्टिव्ह ट्रेनिंग स्कूलमध्ये राज्यातील पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण दिले जात असते. त्यांच्या प्रशिक्षणाचा अत्यावश्यक भाग म्हणून ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथील ‘रस्ता सुरक्षा व जागरुकता’ याविषयाचाही त्यांच्या १५ दिवसांच्या प्रशिक्षणात समाविष्ट करण्यात आला आहे.

प्रशिक्षणार्थीमध्ये संपूर्ण राज्यातील पोलीस दल व महामार्ग रस्ता पोलीस दल, वाहतूक शाखेतील पोलिसांचा समावेश असतो.

नाशिक फर्स्टतर्फे डिटेक्टिव्ह ट्रेनिंग स्कूलच्या आतापर्यत ३० प्रशिक्षण कार्यशाळेतील १५७५ वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

One half thousand traffic police in state benefited from training of Nashik First Nashik News
Toll Collection: देशात जीपीएसद्वारे टोलवसुली होणार सुरू; फास्टॅग होणार इतिहासजमा, कसं ते जाणून घ्या

नुकत्याच पार पडलेल्या वाहतूक पोलीसांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला नाशिक फर्स्टचे वरिष्ठ सदस्य श्रीकांत करोडे, मयूर बागूल यांनी वाहतूक सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले.

नाशिक फर्स्टतर्फे दोन तासांचे रस्ता सुरक्षा व जागरुकता प्रशिक्षण हे सर्वांकरिता मोफत आहे.

आतापर्यंत नाशिक फर्स्टच्या ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये २ लाख ४३ हजारपेक्षा अधिक वाहनचालक व नागरिकांचे रस्ता सुरक्षा व जागरुकता प्रशिक्षण झाले आहे. त्यात शाळा, कॉलेज, बस, ऑटो चालकांचा समावेश आहे.

One half thousand traffic police in state benefited from training of Nashik First Nashik News
Ram temple: 22 जानेवारीला 1 ट्रिलियन आर्थिक उलाढाल अपेक्षित; राम मंदिरामुळे व्यवसायाला चालना!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.