सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर नगरपरिषद, वनप्रस्थ फॉउंडेशन, पूर्णम इकोव्हीजन फाउंडेशन (पुणे) व पर्यावरण संरक्षण गतीविधी यांच्यातर्फे येथे ३६ केंद्रांच्या माध्यमातून राबविलेल्या ई- यंत्रणा महाअभियानात सुमारे दीड टन ई-कचरा संकलित करण्यात आला. (One half ton e waste collected in Sinnar Nashik News)
हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ
सिन्नर शहरातील विविध शाळा व रहिवाशी क्षेत्रात संकलन केंद्र उभारण्यात आले होते. सिन्नर नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी,सिन्नर सायकलिस्ट असोसिएशन, सिन्नर डॉक्टर्स असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, सीमा, सिन्नर शहर व परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट, वनप्रस्थ फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्यासह सिन्नर शहरातील नागरिकांनी या मोहिमेबाबत सायकल रॅली, पथनाट्याद्वारे जनजागृतीचे केली.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात ई कचरा जमा होण्यासाठी मदत झाली. जवळपास 56 स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत जनजागृती केली. क्यूपीड रबर कंपनीनेही सहभाग नोंदवत २०० किलो ईकचरा दान केला आहे.
क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्स यांनी ३० टीव्ही व इतर असे जवळपास ५०० किलो ई- कचरराजमा केला. या मोहिमेत संकलित झालेल्या सर्व ई कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचा पुनर्वापर करता येईल अशा वस्तू, उपकरणांची दुरुस्ती करून गरजूंना दिल्या जातील. अन्य निरुपयोगी इ-कचऱ्याचे शास्त्रीय व पर्यावरणपूरक पद्धतीने रिसायकलर्सकडे विल्हेवाटीसाठी दिला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.