Nashik News: दीड वर्षाच्या कान्हाची मृत्यूशी यशस्वी झुंज

Kanha Yogesh Pawar
Kanha Yogesh Pawaresakal
Updated on

Nashik News : दीड वर्षाच्या कान्हाला डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे जीवदान मिळाले आहे. दीड वर्षाचा कान्हा आईच्या कुशीत झोपला असताना रात्री विषारी सापाने त्यास दंश केला.

डॉक्टरांनी अथक प्रयत्न केल्याने कान्हाने ७२ तासांनी डोळे उघडून आपल्या आई वडिलांना बघितले. आपले बाळ मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचे पाहून आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.

योगेश पवार हे आपल्या कुटुंबासमवेत वंजारवाडी (ता. नांदगाव) गावाजवळ असलेल्या जाधव वस्तीवर राहतात. त्यांना दीड वर्षाचा कान्हा नावाचा मुलगा आहे.

रात्री कान्हा आईच्या कुशीत झोपलेला असताना तो अचानक जोरजोराने रडू लागला. यावेळी त्याचे आईवडील जागे झाले असता कान्हाचा उजवा अंगठा हा सापाच्या तोंडात असल्याचे दिसले.

यानंतर आईने आरडाओरड करताच घरातील सर्व जण जागी झाले. घरच्यांनी तत्काळ सापाला ओढून चिमुकल्याची त्याच्या तावडीतून सुटका केली. यात बाळाचा अंगठा रक्तबंबाळ झाला होता.

साप चावल्याने सर्वांच्या मनात भीतीने काहूर केले. वेळ न घालवता कान्हाला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kanha Yogesh Pawar
Kotwal Recruitment: अनेक वर्षे रेंगाळलेली कोतवाल भरती लवकरच! अनुकंपाधारकांना प्राधान्य देण्याची वारसांची मागणी

परंतु चावलेला साप हा मण्यार जातीचा असल्याने तो विषारी होता. त्यामुळे परिस्थिती गंभीर होती. डॉक्टरांनी मुलाला मालेगाव येथील रुग्णालयात पाठवले परंतु बाळाची तब्येत बिघडत चालली असल्याने त्यास तत्काळ नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले. तब्बल तीन दिवसांनी बाळाने डोळे घेऊन आपल्या आई वडिलांकडे बघितले. सुमारे ७२ तास दीड वर्षाचा कान्हा मृत्यूशी झुंज देत होता. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे त्याने मृत्यूशी दोन हात करत मृत्यूला हरविले.

Kanha Yogesh Pawar
Dada Bhuse: योजनांच्या लाभासाठी गावनिहाय मोहीम राबविणार : दादा भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.