Nashik Agriculture News : जिल्ह्यात 1 लाख टन खतसाठा पडून; बियाणे खरेदीकडेही शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

Nashik Fertilizer News
Nashik Fertilizer Newsesakal
Updated on

Nashik News : बिपोरजॉय चक्रीवादळ आणि अल निनोच्या परिणामांमुळे मॉन्सूनच्या आगमनाला थेट फटका बसल्याने जूनच्या सुरवातीला पेरणीची तयारी सुरू करणारे शेतकरी यंदा चिंतेत आहेत. जिल्ह्यात यंदाच्या खरिपात खतांचा मुबलक प्रमाणात पुरवठा झाला आहे.

मात्र, पाऊस लांबल्याने खतांची उचल झाली नाही. तर, शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीकडे सपशेल पाठ फिरविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात विविध गुदामे, दुकाने आदी ठिकाणी मिळून तब्बल एक लाख टन खते पडून आहेत.

राज्यात नाशिक जिल्हा खतांच्या वापरामध्ये आघाडीवर असल्याने खरिपात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खतांची गरज असल्याने मागणीदेखील अधिक करावी लागते. (One lakh tonnes of fertilizer stockpiled in district Farmers have also Not buying seeds Nashik Agriculture News)

त्यादृष्टिने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खरीप हंगामासाठी निश्चित केलेल्या सहा लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रासाठी २ लाख ५८ हजार टन खतांची मागणी नोंदविली होती. यापैकी २ लाख २८ हजार ८६० टन खत साठा मंजूर झाला आहे.

गतवर्षीचा ९९ हजार ९३८ टन खतसाठा शिल्लक असून जून अखेर १ लाख ५३ हजार ८३९ टन आवटंन प्राप्त झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ८८६ टन खतसाठा उपलब्ध आहे. मात्र, जिल्हयात पावसाने ओढ दिली आहे.

१५ जून उजाडून देखील मॉन्सूनच्या पावसाने जिल्हयात हजेरी लावलेली नाही. पावसाने ओढ दिलेली असल्याने बाजारात खतांची हवी तशी उचल झाली नाही. जिल्हयात दर महिन्याला खतांचा सुरळीत व हवा तेवढा किंवा लक्ष्यांकानुसार पुरवठा खत कंपन्यांनी केला.

मात्र, मागणीअभावी खते पडून आहेत. जिल्ह्यात युरिया, संयुक्त खते, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश अशी सर्वच खते कमी अधिक प्रमाणात पडून आहेत. डीएपी अधिक प्रमाणात पडून असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे मिळाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Fertilizer News
Nashik Farmer News : राजकीय धूळवडीमध्ये शेतकरी वाऱ्यावर; 547 गावे अन् 1400 वाड्या तहानलेल्या

खतसाठापडून असताना दुसरीकडे बियाणे खरेदीसाठी देखील शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार १ लाख ५ हजार १७४ क्विटंल बियाणे मंजूर झाली आहेत. यापैकी ८२ हजार ७७१ क्विंटल बियाणांचा पुरवठा झाला आहे. यात बाजारात केवळ १ हजार ७९९ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली झाली आहे.

आपत्कालीन पीक नियोजन

"खरीप हंगामासाठी लागणारे खतसाठाबियाणे याचा पुरवठा झाला आहे. खते व बियाणे विक्रेत्यांची बैठक घेतली असता यात, खते व बियाणे यांना उचल नसल्याचे, विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. पाऊस आणखी लांबणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पाऊस लांबल्यावर आपत्कालीन पीक नियोजन देखील कृषी विभागाने करून ठेवले आहे."

कैलास शिरसाठ, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद

Nashik Fertilizer News
Nashik News: पुनर्विनियोजनातील केलेले नियोजन रद्द करा; राज्याच्या नियोजन विभागाकडे 6 आमदारांची तक्रार

आपत्कालीन पीक नियोजन

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात उशिराने पावसास सुरवात व नियमित पावसाच्या कालावधीत खंड पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याअनुषगांने कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पीक नियोजन करण्यात आले आहे. पेरणी योग्य पावसाचा आगमन कालावधी कोणती पिके घ्यावीत कोणती पिके घेऊ नयेत.

१५ ते ३० जून सर्व खरीप पिके -

१ जुलै ते ७ जुलै सर्व खरीप पिके -

८ जुलै ते १५ जुलै सोयाबीन, मका, सं. ज्वारी, सं. बाजरी, कापूस, तूर, तीळ, भुईमूग, मुग, उडीद

सूर्यफूल

१६ जुलै ते ३१ जुलै सोयाबीन, मका, बाजरी, तूर, भात कापूस, सं. ज्वारी, भुईमूग

१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट सं. बाजरी, रागी, सूर्यफूल, तूर, कापूस, सं. ज्वारी, भुईमूग,

उशिरा पावसास सुरवात झाल्यास..

- जमिनीत पुरेसा ओलावा असल्यानंतरच पेरणी करावी. आंतरपिकपध्दतीचा जास्तीत जास्त वापर.

- साधारणतः २० ते २५ टक्के अधिक बियाण्याचा वापर.

- रासायनिक खतांच्या वापरात किमान २५ टक्के कपात.

- मुग, उडीद पिकाची पेरणी शक्यतो नापेर क्षेत्रावर करावी, या पिकाखालील क्षेत्र कमी करणे.

- सोयाबीन पिकाची पेरणी २५ जुलै पर्यंतच करावी व पेरणीसाठी उगवण क्षमता

- तपासून घरचे बियाणे वापरावे.

- सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घ्यावे.

- उशिरा पेरणीसाठी ज्वारीमध्ये बियाण्याचा दर ३० टक्क्यांनी वाढवावा व खोडमाशीचा

- प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्या.

- उपलब्ध पर्जन्याचा उपयोग करून घेण्यासाठी मुलस्थानी जलसंधारण उपाययोजना उताराला आडवी मशागत व पेरणी, रुंद सरी वरंबा पध्दतीचा वापर इत्यादी उपाययोजना कराव्या.

- पावसाचा खंड कालावधी लक्षात घेऊन संरक्षित सिंचनाचा वापर करावा.

- जमिनीत ओलावा राहण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा.

- तृणधान्य पिकांवर २ टक्के युरिया तसेच कापूस व कडधान्य पिकावर २ टक्के DAP ची फवारणी करावी.

Nashik Fertilizer News
Farmer Suicide Maharashtra: धक्कादायक! एकट्या अमरावती विभागात बावीस वर्षांत १९ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.