Transfer: सर्वसाधारण बदल्यांना महिनाभराची मुदतवाढ; प्रतिक्षा लागून असलेल्या विभागप्रमुखांमध्ये नाराजी

Transfers
Transfersesakal
Updated on

Transfer : कोरोना संकटामुळे गत तीन वर्षापासून न झालेल्या शासकीय अधिकारी -कर्मचारी बदली प्रक्रीया सुरू असल्याने अधिकारी -कर्मचारी बदल्यांच्या प्रतिक्षेत होते. मात्र, त्यांना आणखी महिनाभराची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

राज्य शासनाने अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्यांना महिनाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वेध लागलेल्या जिल्हा परिषदेतील चार विभागप्रमुखांची मोठी निराशा झाली आहे. (One month extension for general transfers Frustration among waiting department heads nashik news)

साधारण एप्रिल -मे महिन्यात शासकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाच्या बदल्या होत असतात. कोरोना संकटामुळे गत दोन वर्षांपासून ही बदली प्रक्रीया झालेली नव्हती. गतवर्षी बदली प्रक्रीया होणार होती त्यादृष्टीने तयारी देखील झाली.

मे महिन्यात प्रक्रीया पूर्ण न झाल्याने त्यास ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, जून महिन्यातचं महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे व फडणवीस सरकार सत्तेत आले. या सरकारकडून बदल्या होणार असे सांगितले गेले.

मात्र, ग्रामविकासच्या बदल्या वर्षभर होऊ शकल्या नाही. यंदा ग्रामविकासच्या बदल्या होणार असे निश्चित होते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील गट क व ड वर्गातील बदली प्रक्रीया गत आठवड्यातचं पार पडली. ही प्रक्रीया झाल्यानंतर गट अ वर्गातील बदल्यांचे वेध लागले होते.

यात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांची गत आठवड्यात बदली होऊन येथे एस. शिंदे यांची बदली झाली ते दोन दिवसांपूर्वीच हजर देखील झाले. त्यानंतर उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आनंद पिंगळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा बालविकास अधिकारी दीपक चाटे यांचा कार्यकाळ तीन वर्षांपेक्षा अधिक झालेला असल्याने त्यांना बदल्यांची प्रतिक्षा होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Transfers
Nashik News : डिजे, बॅण्डमुळे ताशा, संबळ कालबाह्य होण्याच्या मार्गावर; कलावंतावर उपासमारीची वेळ

गत तीन दिवसांपासून हे अधिकारी बदल्यांची वाट बघत दिवस काढत होते. मंगळवारी (ता.३०) बदल्यांचे आदेश येतील यासाठी अनेकांनी आवरा-सावर देखील केली. मात्र, राज्य शासनाने सायंकाळी या बदल्यांना महिनाभराची मुदतवाढ दिली असून ३० जून २०२३ पर्यंत बदल्या होणार असल्याचे आदेश काढले आहे.

त्यामुळे या अधिकाऱ्यांची निराशा झाली आहे. गतवर्षीप्रमाणे महिनाभराची मुदतवाढ मिळाल्याने बदल्या होणार की नाही याबाबत पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

विभागाची पाटी देखील काढली

मंगळवारी आपल्या बदलीचे आदेश मिळणार असल्याचा दृढविश्वास असलेल्या एका अधिका-यांने सायंकाळीच आपल्या नावाची लावलेली पाटी उतरून ठेवली. संबंधित अधिकाऱ्यांना बदली होणार असल्याने स्वतः आपली पाटी काढून घेतली होती.

त्यानंतर काही तासात बदल्यांना मुदतवाढ मिळाल्याने पाटी काढलेल्या अधिकाऱ्यास पुन्हा पाटी लावण्याची वेळ आल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होती.

Transfers
NAFED Onion Purchase : यंदा नाफेड कांदा खरेदी निकष पाळून पारदर्शक होण्यासाठी प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.